सकाळ डिजिटल टीम
टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद तिच्या हटके अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते.
यावेळी उर्फी एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. नव्या वर्षाच्या निमित्ताने तिने अध्यात्मिक दृष्टीकोन स्वीकारला आहे.
उर्फीने ४०० पायऱ्या चढून शिवमंदिरात महादेवाचे दर्शन घेतले आणि याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
उर्फी निळ्या रंगाचा कुर्ता आणि साधा मेकअप करत अतिशय साध्या आणि सुंदर लूकमध्ये दिसत आहे.
मंदिरात महादेवाला हात जोडून आशीर्वाद घेतानाचा तिचा फोटो तिच्या भक्तिभावाची झलक दाखवतो.
उर्फीने फोटोला कॅप्शन देत लिहिले, "या शिवमंदिरापर्यंत ४०० पायऱ्या चढून आले आहे."
उर्फीच्या भक्तिभावावर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे. काहींनी तिच्या कृतीचे कौतुक केले, तर काहींनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.