Apurva Kulkarni
आपल्या अदांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या उर्मिला मातोंडकर हिचं आयुष्य एका पुरुषामुळं उद्ध्वस्त झालं.
उर्मिलाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. रंगीला, सत्या, जुदाई, आग हे चित्रपट सुपरहिट ठरले.
परंतु प्रेमामुळे तिचं आयुष्य उद्व्धस्त झालं. एका व्यक्तीमुळे तिचे सिनेसृष्टीतील करिअर संपलं.
माहितीनुसार उर्मिता मातोंडकर ही दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या प्रेमात होती. त्यांनी प्रत्येक सिनेमांमध्ये उर्मिलाला कास्ट केलं.
उर्मिला आणि वर्मा यांच्या नात्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या. परंतु काही कारणास्तव उर्मिला हिचं रामगोपाल वर्मा यांच्यासोबत असलेलं नातं तुटलं.
परंतु वर्मा यांच्यासोबत काम करण्यासाठी उर्मिलाने इतर दिग्दर्शकांच्या ऑफर नाकारल्या होत्या. त्यामुळे तिला सिनेमाची ऑफर येणं बंद झालं.
2016 मध्ये उर्मिलाने उद्योजक मोहसिन अख्तर मीर यांच्यासोबत लग्न केलं. ते एक कश्मीरमधील उद्योजक आहेत.
परंतु गेल्या काही दिवसात उर्मिला आणि मोहसिन यांच्यासुद्धा घटस्फोटाच्या चर्चा रंगत होत्या.