US-Israel-Iran War: Middle East म्हणजे नेमकं कुठे? भारत त्याला ‘पश्चिम आशिया’ का म्हणतो?

Vinod Dengale

Middle East म्हणजे काय?

आज अमेरिकेच्या सहाय्याने इस्राइलने इराणवर हल्ला केल्याने Middle East हा भाग चर्चेत आला आहे. पण हा प्रदेश नेमका कोणता प्रदेश आहे, हे अनेकांना स्पष्टपणे माहित नाही.

Where is the Middle East

तेलाचा खजाना

हा प्रदेश आशिया, युरोप आणि आफ्रिका यांच्या मधोमध येतो. या प्रदेशात तेल साठे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जागतिक अर्थकारणात आणि राजकारणात याला महत्वाचे स्थान आहे.

Where is the Middle East

कोणत्या देशांचा समावेश

यात सौदी अरेबिया, इराण, इराक, सिरिया, Yemen, UAE, इस्राइल, कतार आदि देशांचा समावेश होतो.

Where is the Middle East

Middle East नाव कुठून आलं?

युरोपियन देशांनी त्यांच्या पूर्वेला असलेल्या प्रदेशांना 'जवळचा पूर्व' (Near East) आणि 'दूरचा पूर्व' (Far East) असे नाव दिले. त्या दोघांच्यामध्ये असलेल्या भागाला त्यांनी 'Middle East' असे नाव दिले.

Where is the Middle East

भारताच्या दृष्टीने हा भाग कोणता?

भारताच्या नकाशावर पाहिल्यास हा प्रदेश भारताच्या पश्चिमेला आहे. म्हणून भारतात या भागाला 'पश्चिम आशिया' (West Asia) असे म्हटले जाते.

Where is the Middle East

West Asia म्हणजे काय?

West Asia म्हणजे आशिया खंडाचा पश्चिमेकडील भाग. हा भौगोलिक शब्द आहे आणि नकाशावर आधारित आहे. म्हणून तो अधिक अचूक मानला जातो.

Where is the Middle East

भारत सरकार कोणता शब्द वापरते?

भारत सरकार अधिकृत कागदपत्रांमध्ये West Asia (पश्चिम आशिया) हा शब्द वापरते. कारण तो भौगोलिकदृष्ट्या योग्य आहे.

Where is the Middle East

दोन्ही एकच

थोडक्यात सांगायचे तर, आजच्या जागतिक राजकारणात 'Middle East आणि पश्चिम आशिया हे शब्द एकाच प्रदेशासाठी वापरले जातात.

Where is the Middle East

T20 World Cup: How Net Run Rate (NRR) is Calculated Explained Simply

|

eSakal

T20 WC: नेट रन रेट कसा कॅलक्युलेट करतात? जाणून घ्या एकदम सोप्या भाषेत