Monika Shinde
उन्हाळ्यात खूप उष्णता असते, ज्यामुळे केस खराब होऊ शकतात. घाम आणि उष्णतेमुळे केस तेलकट होतात, आणि त्यामुळे केस तुटण्याची समस्या देखील वाढते.
जर तुमचे केस उन्हाळ्यात तेलकट होऊन जास्त तुटत असतील, तर हेअर मास्क वापरणे चांगला पर्याय आहे.
घरच्या घरी तयार केलेले एक पौष्टिक मिश्रण, जे केसांच्या मुळापर्यंत पोहोचून त्यांना पोषण, मऊपणा आणि चमक देते.
१ चमचा मेथी पावडर, १ वाटी दही, आणि १ चमचा नारळ तेल घ्या. या सगळ्या गोष्टी एकत्र करून चांगले मिक्स करा आणि केस धुण्याआधी १ तासापूर्वी हे मिश्रण केसांवर लावा.
हेअर मास्क केसांना आवश्यक पोषण देतो. केस मऊ आणि चमकदार होतात. आणि आठवड्यातून दोन वेळा वापराने केस तुटणे कमी होते आणि केस मजबूत होतात.