शरीरातल्या 'या' 5 अवयवांचं आता काहीच काम नाही; उत्क्रांतीनंतर तसेच राहिले

संतोष कानडे

अवयव

मानवी शरीरामध्ये असे काही अवयव आहेत, ज्यांचा आज काहीच उपयोग नाही. मात्र आपल्या पूर्वजांसाठी हे अवयव अत्यंत उपयुक्त होते.

उत्क्रांती

लाखो वर्षांपूर्वी उत्क्रांती झाली, जीवनशैली बदलली आणि या अवयवांचं काम संपलं. तरीही ते शरीरात तसेच पडून आहेत.

अक्कलदाढ

यापैकी एक आहे अक्कलदाढ. आदिमानवांचा आहार हा कच्ची पानं, मुळं, कडक मांस असा होता. त्यासाठी त्या दाढेचा वापर होत असे.

अन्न

आता अक्कलदाढेचा काहीही उपयोग नाही. माणसू अन्न शिवजून खायला लागलाय, त्यामुळे जबड्यावरचा ताण कमी झाला आणि जबडा लहान आकाराचा झाला.

वेदना

सध्या आपल्या जबड्यात ३२ दातांनाच पुरेशी जागा नसते. तरीही अक्कलदाढ येते ती हिरड्या कापून. त्यामुळे आपल्याला खूपच वेदना सहन कराव्या लागतात.

शाकाहारी

अपेंडिक्सचा वापर हा पचनक्रियेसाठी व्हायचा. जेव्हा मानव पूर्णपणे शाकाहारी होता तेव्हा झाडांच्या फांद्या, कच्चा पालापाचोळा खायचा. त्यामुळे त्यातील सोल्युलोज पचण्यासाठी मोठ्या अपेंडिक्सचा वापर होई.

सोल्युलोज

आता आपल्याला सोल्युलोज पचवण्याची गरज नाही. त्यामुळे हा अवयव हळूहळू लहान होत गेला. तो शरीरात नसला तरी पचनक्रियेला काही फरक पडत नाही.

कानाचे स्नायू

कानाचे स्नायू देखील आता तसे कामाचे राहिले नाहीत. मांजर, कुत्रा, जसे आवाजाच्या दिशेने कान फिरवतात; तसे आपले पूर्वज भक्ष्याचा किंवा धोक्याचा आवज टिपण्यासाठी कानाची हालचाल करत असत.

लवचिक

आज मात्र मानवाची मान अधिक लवचिक झाली आहे. त्यामुळे आवाजाच्या दिशेने कान फिरवण्याची गरज नाही, आपण मान फिरवून पाहू शकतो आणि ऐकू शकतो. मात्र हे स्नायू आजही आहेत.

माकडहाड

माकडहाडाचा उपयोग तसा आज नाही. परंतु जेव्हा आपल्या पूर्वजांना शेपटी होती तेव्हा झाडावर संतूलन राखण्यासाठी हाडांचा वापर होत असे.

शेपटी

माणसाने दोन पायांवर चालण्यास सुरुवात केल्यानंतर शेपटीची गरज उरली नाही. मात्र शेवटी गेली आणि माकडहाड शरीरात शिल्लक आहे.

अंगावर काटा येणे

आजही आपल्या अंगावर काटा येतो. थंडी वाजणे, भीता वाटणे असं झाल्यास अंगावरचे केस उभे रहायचे. त्यामुळे शरीरात उष्णता टिकून रहायची.

भीती

आता मानवाच्या शरीरावर केस आहेत, पण खूपच कमी झालेत. थंडी वाजल्यास किंवा भीती वाटल्यास काटा येतो, पण त्याचा थंडीपासून वाचण्यासाठी तसा उपयोग नाही.

मुंग्यांचं डेथ सर्कल; पृथ्वीवरचं भयाण रहस्य

<strong>येथे क्लिक करा</strong>