Anuradha Vipat
मराठी मनोरंजन विश्वात अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे.
या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व सारा अली खानने खास उपस्थिती लावली होती
‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला ‘जीवन गौरव’ व ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असे मानाचे दोन पुरस्कार दिले जातात.
यंदाच्या वर्षी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला आहे
ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना भारतीय संगीतातील आपल्या बहुमूल्य योगदानासाठी ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे
मराठीसह हिंदी, गुजराती, बंगाली, नेपाळी, मणिपुरी अशा भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली आहेत