Apurva Kulkarni
मराठी आणि हिंदी मालिकाविश्वात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या उषा नाडकर्णी यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं.
एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, 'लता मंगेशकर त्यांच्या शेजारी होत्या. त्यांनी एक दिवस लता मंगेशकर यांच्या घरी कार्यक्रमात डान्स केला म्हणून वडिलांनी त्यांनी खूप मारलं.'
'जेव्हा मी लता मंगेशकर यांच्या घरी गणपती कार्यक्रमात जात होते. तेव्हा वडील मला ओढून मारत-मारत घरी आणायचे.'
उषा नाडकर्णी यांनी सांगितलं की, त्यांच्या आईचा अभिनयाला प्रचंड विरोध होता.
त्यांच्या आईला भिती होती की, मुलगी अभिनयात गेली तर, त्याच्या प्रतिष्ठा खराब होईल. तसंच उषा नाडकर्णी यांचं लग्न होणार नाही.
एक दिवस उषा नाडकर्णीच्या आईने त्यांचे सगळे कपडे घराबाहेर फेकले आणि म्हणाली, अभिनय करायचं असेल तर घर सोडून दे.
तेव्हा उषा नाडकर्णी या घर सोडून मैत्रिणीकडे राहायला गेल्या. तेव्हा त्याचे वडील शोधत त्यांना नेयला आले.
उषा नाडकर्णी यांनी 1979 मध्ये मराठी चित्रपट सिंहासनमधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आज त्यांची जेष्ठ कलाकार म्हणून ओळख आहे.