नकाशावरील शेवटचं शहर कसं दिसतं? पाहा फोटो

Aarti Badade

जगाचे शेवटचे टोक!

नकाशावर जगाचं शेवटचं टोक नेमकं कुठे असेल? हा विचार केला की समोर येतं ते म्हणजे अर्जेंटिनातील 'उशुआइया' (Ushuaia) हे शहर.

World's last city Ushuaia

|

Sakal

मानवी वस्तीची शेवटची सीमा

दक्षिण अमेरिकेच्या अगदी टोकावर वसलेल्या या शहराला 'जगाचा शेवटचा किनारा' मानले जाते. यापुढे मानवी कोलाहल कायमचा थांबतो.

World's last city Ushuaia

|

Sakal

अंटार्क्टिकाचे प्रवेशद्वार

उशुआइया येथून अंटार्क्टिका खंडाचे अंतर केवळ १,००० किलोमीटर आहे. म्हणूनच या शहराला 'अंटार्क्टिकाचे प्रवेशद्वार' असेही म्हणतात.

sakal

विलोभनीय निसर्गसौंदर्य

रंगीबेरंगी घरे आणि समोर पसरलेला निळाशार समुद्र असे विलोभनीय दृश्य येथे पाहायला मिळते. हे शहर टिएरा डेल फ्यूगो राज्याची राजधानी आहे.

World's last city Ushuaia

|

Sakal

भाषेचा अनोखा संगम

येथे मुख्यत्वे स्पॅनिश भाषा बोलली जाते, मात्र जगभरातून येणाऱ्या पर्यटकांमुळे येथे इंग्रजीचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतो.

World's last city Ushuaia

|

Sakal

आव्हानात्मक हवामान

येथील हवामान अतिशय थंड आणि अनपेक्षित असते. शहराच्या पलीकडे फक्त निसर्गाचा भयाण सन्नाटा आणि अथांग बर्फाळ वाळवंट पसरलेले आहे.

World's last city Ushuaia

|

Sakal

पर्यटकांचे आवडते ठिकाण

जगाच्या टोकावर उभं राहण्याचा थरार अनुभवण्यासाठी जगभरातून पर्यटक उशुआइयाला भेट देतात. हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक नंदनवन आहे.

World's last city Ushuaia

|

Sakal

एका तासाला 5000 लिटर खर्च! मग विमानाची टाकी फुल्ल करायला किती इंधन लागतं?

Airplane fuel capacity

|

Sakal

येथे क्लिक करा