सिडनी कसोटीत एकट्या उस्मान ख्वाजाने का बांधलेली दंडाला काळी पट्टी?

Pranali Kodre

भारत आणि ऑस्ट्रेलिया

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ जानेवारी २०२५ पासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी सामना सुरू झाला आहे.

India vs Australia | Sakal

पाचवा कसोटी

हा सामना कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना आहे.

India vs Australia | Sakal

उस्मान ख्वाजा

या सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने त्याच्या दंडाला काळी पट्टी बांधली होती.

Usman Khawaja | Sakal

काळी पट्टी

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ऑस्ट्रेलिया संघात त्याने एकट्यानेच ही काळी पट्टी बांधली होती.

Usman Khawaja | Sakal

कारण

युकेमधील डेली मेलच्या रिपोर्ट्सनुसार त्याने माजी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ऍशवेल प्रिन्स याच्या पत्नीला श्रद्धांजली म्हणून काळी पट्टी बांधली होती.

Usman Khawaja | Sakal

मित्र

प्रिन्स आणि ख्वाजा चांगले मित्र होते, त्यामुळे त्यांच्यातील कौटुंबिक नातेही चांगले होते.

Ashwell Prince Family | Instagram

निधन

प्रिन्स याची पत्नी मेलिसा हिचे डिसेंबर २०२४ च्या अखेरीस कर्करोगाने निधन झाले.

Ashwell Prince Family | Instagram

जनजागृती

विशेष म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यातून कर्करोगाबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वत्र गुलाबी रंग दिसून येत आहे.

Usman Khawaja | Sakal

पिंक डे

कर्करोगाच्या जनजागृतीसाठी या सामन्यातील तिसरा दिवसही पिंक डे म्हणून साजरा केला जाणार आहे.

Australia vs India Sydney Test | Sakal

साल २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ भारतीय

Jasprit Bumrah | Sakal
येथे क्लिक करा