सरकारचे मोठे पाऊल! खास 'एसी हेल्मेट' लाँच, किंमत किती? जाणून घ्या वैशिष्ट्ये

Vrushal Karmarkar

वाहतूक पोलीस

उन्हात आणि पावसात तासन्तास रस्त्यावर उभे असलेल्या वाहतूक पोलिसांचा विचार करा. जे वाहतूक व्यवस्था राखतात जेणेकरून तुम्ही वेळेवर घरी पोहोचू शकाल.

AC helmets | ESakal

एसी हेल्मेटची व्यवस्था

यामुळे वेळोवेळी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वाहतूक पोलिसांसाठी एसी हेल्मेटची व्यवस्था केली जाते. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने वाहतूक पोलिसांसाठी एसी हेल्मेटची व्यवस्था देखील केली आहे.

AC helmets | ESakal

अ‍ॅक्टिव्ह कूलिंग हेल्मेट

तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की हे एसी हेल्मेट कसे असते आणि ते कसे काम करते. हैदराबादमधील जर्श सेफ्टी नावाची कंपनी आहे.

AC helmets | ESakal

हेल्मेट लाँच

गेल्या वर्षी या कंपनीने विशेषतः एसी बसवलेले हेल्मेट लाँच केले. अ‍ॅक्टिव्ह कूलिंग नावाचे हे एसी हेल्मेट विशेषतः वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तसेच बांधकाम कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी सादर करण्यात आले होते.

AC helmets | ESakal

देशभर हेल्मेटची चर्चा

काही दिवसांतच या एसी हेल्मेटची चर्चा देशभर पसरली. अनेक राज्यांमधील वाहतूक पोलिसांना हे हेल्मेट देण्यात आले. जेणेकरून त्यांना कडक उन्हात काम करताना थोडा आराम मिळेल.

AC helmets | ESakal

२०० ग्रॅम एसी

या हेल्मेटमध्ये २०० ग्रॅम एसी आहे. कंपनीचा दावा आहे की हे हेल्मेट सामान्य तापमान १०-१५ अंशांनी कमी करण्यास सक्षम आहे.

AC helmets | ESakal

डोके थंड राहील

समजा बाहेरचे तापमान ४५ अंश सेल्सिअस असेल. तर ते परिधान केलेल्या व्यक्तीचे डोके थंड राहील. त्यांना फक्त ३०-३५ अंश जाणवेल.

AC helmets | ESakal

हेल्मेटची किंमत

या एसी हेल्मेटची किंमत १३ ते १७ हजार रुपयांपर्यंत आहे. जार्श सेफ्टीच्या या एसी हेल्मेटमध्ये एक लहान एसी आहे, जो बॅटरीवर १० तास चालू शकतो.

AC helmets | ESakal

कूलिंग सिस्टम

हेल्मेटमधील बॅटरी पंखा चालवते. थंड हवा देण्यासाठी जेल पॅक किंवा बाष्पीभवन कूलिंग सिस्टम देखील वापरला जातो. त्यात लहान पंखे आणि कूलिंग सिस्टम आहेत. जे बाईक रायडरचे डोके थंड ठेवतात.

AC helmets | ESakal

वाहतूक पोलिसांसाठी वरदान

एकंदरीत असे म्हणता येईल की तंत्रज्ञानाच्या युगात एसी हेल्मेट विशेषतः त्या हजारो वाहतूक पोलिसांसाठी एक वरदान आहे. जे उन्हाळ्यात खूप त्रास सहन करायचे.

AC helmets | ESakal

महुआ मोईत्रांनी पिनाकी मिश्रांसोबत बांधली लग्नगाठ; ते नेमके आहेत तरी कोण? जाणून घ्या दोघांची संपत्ती

Mahua Moitra and Pinaki Mishra Marriage | ESakal
वाचा सविस्तर...