सकाळ डिजिटल टीम
गुजरातच्या वाडिया गावात मुलींसमोर दोनच पर्याय असतात. एकतर लहान वयात मुलीचा साखरपुडा किंवा वेश्याव्यवसाय करायचा.
Wadia
Sakal
बनासकांठा जिल्ह्यातील वाडियाला ‘वेश्यांचं गाव’ म्हणूनही ओळखलं जातं. येथे सराणिया समाजाची वस्ती आहे.
Wadia
Sakal
मुलींना वेश्याव्यवसायापासून दूर ठेवण्यासाठी सात ते बारा वर्षांतच साखरपुडा केला जातो.
Wadia
Sakal
पिढ्यान्पिढ्या या गावातील महिलांना देहव्यवसायात ढकललं गेलं. धक्कादायक म्हणजे कुटुंबातील पुरुष ग्राहक आणण्याचं काम करतात.
Wadia
Sakal
शेतीसाठी जमीन मिळाली, पण सिंचनाअभावी उत्पन्न मिळालं नाही. त्यामुळे कुटुंबं पुन्हा या दलदलीकडे वळली.
Wadia
Sakal
२०१२ मध्ये वाडियात पहिला सामूहिक विवाह सोहळा झाला. त्यानंतर मुलींना या चक्रातून बाहेर काढण्याचे प्रयत्न वाढले.
Wadia
Sakal
शिक्षण, शेती आणि व्यवसायासाठी मदत करण्यात आली. त्यानंतर १६० पैकी ९० कुटुंबांनी हा व्यवसाय सोडत नवा मार्ग स्वीकारलाय.
Wadia
Sakal
वाडियाची ओळख बदलण्याचा प्रयत्न सामाजिक संस्थांकडून केला जात आहे. पण समाज मात्र जुन्या प्रथेतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही.
Wadia
Sakal
Gen Z Unpolished Look trend
Sakal