वैभव सूर्यवंशीने १५ व्या वर्षीच केले १० वर्ल्ड रेकॉर्ड

Pranali Kodre

२०४ धावांची विश्वविक्रमी खेळी

१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने रायझिंग स्टार आशिया कप २०२६ स्पर्धेत युएईविरुद्ध खेळताना २८ षटकारांसह २०४ धावांची विश्वविक्रमी खेळी केली.

Vaibhav Sooryavanshi World Records

|

Sakal

अनेक विक्रम नावावर

ही खेळी करताना त्याने २८ चेंडू शतक, ४० चेंडूत दीडशतक आणि ५२ चेंडूत द्विशतक करत अनेक विक्रम नावावर केले.

Vaibhav Sooryavanshi World Records

|

Sakal

सर्वात जलद शतक, दीडशतक आणि द्विशतक

वैभव आता लिस्ट ए वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक, दीडशतक आणि द्विशतक करणारा खेळाडू आहे.

Vaibhav Sooryavanshi World Records

|

Sakal

२८ षटकार

याशिवाय त्याने लिस्ट ए वनडे क्रिकेटमध्ये २८ षटकरांसह एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विश्वविक्रमही केला.

Vaibhav Sooryavanshi World Records

|

Sakal

विश्वविक्रम

यापूर्वीच त्याच्य़ा नावावर अनेक विश्वविक्रम होते, ते कोणते तेही पाहू.

Vaibhav Sooryavanshi World Records

|

Sakal

आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक

वैभव आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणारा भारतीय आहे, त्याने २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्ससाठी ३५ चेंडूत शतक केले होते.

Vaibhav Sooryavanshi World Records

|

Sakal

IPL शतक करणारा सर्वात युवा

वैभव टी२० क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात युवा खेळाडूही आहे. त्याने आयपीएलमध्ये केवळ १४ व्या वर्षी शतक केले होते.

Vaibhav Sooryavanshi World Records

|

Sakal

IPL Debut

इतकंच नाही, तर वैभव आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू आहे. त्याने १४ व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून २०२५ मध्ये आयपीएल पदार्पण केले होते.

Vaibhav Sooryavanshi World Records

|

Sakal

आयपीएल २०२६ मध्ये ७२ षटकार

वैभवने आयपीएल २०२६ मध्ये ७२ षटकार मारले होते, त्यामुळे तो एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे.

Vaibhav Sooryavanshi World Records

|

Sakal

१२ षटकार

त्याने आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दोनदा १२ षटकार मारले होते. त्यामुळे एका आयपीएल डावात सर्वाधिक षटकार ठोकणारा तो भारतीय खेळाडू आहे.

Vaibhav Sooryavanshi World Records

|

Sakal

१५ व्या वर्षी टी२० कर्णधार

सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये त्याने बिहारचे नेतृत्व केल्याने तो १५ व्या वर्षी वरिष्ठ टी२० संघाचे नेतृत्व करणारा पहिला खेळाडू ठरला.

Vaibhav Sooryavanshi World Records

|

Sakal

भारतासाठी टी२० पदार्पण

वैभवने जून २०२६ मध्ये इंग्लंडविरुद्ध १५ व्या वर्षीच भारतासाठी टी२० पदार्पण केले. त्यामुळे तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला.

Vaibhav Sooryavanshi World Records

|

Sakal

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक

वैभवने जुलै २०२६मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी२० सामन्यात अर्धशतक केल्याने तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला.

Vaibhav Sooryavanshi World Records

|

Sakal

Photo: न्यूझीलंडमध्ये चक्क 'खंडाळा' गाव अन् गावस्कर-कपिल देव यांच्या नावाचे रस्ते

Khandallah Village Suburb in Wellington New Zealand

|

Sakal

येथे क्लिक करा