सचिनचा 'नर्व्हस 90' वैभव सूर्यवंशीकडे! बघा कितीवेळा हुकलंय शतक

Varsha Balhe

वैभव सूर्यवंशी

वैभव सूर्यवंशीचं नाव सध्या क्रिकेटमध्ये चांगलंच चर्चेत आहे. मात्र त्याच्या नावावर एक वेगळाच विक्रमही जमा झाला आहे. ९०च्या दशकात बाद होण्याची वैभवची ही सातवी वेळ आहे. नोव्हेंबर २०२५पासून त्याच्यासोबत हा प्रकार सात वेळा घडला आहे.

VAIBHAV SOORYAVANSHI NERVOUS 90 RECORD

|

esakal

रणजी आणि दुलीप ट्रॉफी

वैभवला फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दोनदा शतकाच्या अगदी जवळ जाऊन विकेट गमवावी लागली. रणजी ट्रॉफीत तो ९३ धावांवर, तर दुलीप ट्रॉफीत ९२ धावांवर बाद झाला.

VAIBHAV SOORYAVANSHI NERVOUS 90 RECORD

|

esakal

लिस्ट ए क्रिकेट

लिस्ट ए क्रिकेटमध्येही वैभव शतकापासून काही धावा दूर राहिला. श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध त्याने ९४ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर त्याला आपलं शतक पूर्ण करता आलं नाही.

VAIBHAV SOORYAVANSHI NERVOUS 90 RECORD

|

esakal

आयपीएल

आयपीएल २०२६मध्ये तर वैभवसोबत हा प्रकार तीन वेळा घडला. लखनौसुपर जायंट्सविरुद्ध त्याने ९३, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ९७, तर गुजरात टायटन्सविरुद्ध ९६ धावा केल्या. तिन्ही सामन्यांत शतक अवघ्या काही धावांनी हुकलं.

VAIBHAV SOORYAVANSHI NERVOUS 90 RECORD

|

esakal

चार वेळा शतक हुकलं

विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यांत वैभव सूर्यवंशी चार वेळा ९०च्या दशकात बाद झाला आहे. १९ मे रोजी लखनौविरुद्ध ९३, २७ मे रोजी सनराइजर्स हैदराबादविरुद्ध ९७, २९ मे रोजी GTविरुद्ध ९६ आणि २१ जून रोजी श्रीलंका ‘अ’विरुद्ध ९४ धावा त्याने केल्या.

VAIBHAV SOORYAVANSHI NERVOUS 90 RECORD

|

esakal

विकेट

वैभवने कमी वयात मोठ्या सामन्यांमध्ये दमदार फलंदाजी करून आपली क्षमता दाखवली आहे. मात्र शतकाच्या जवळ पोहोचल्यानंतर विकेट गमावण्याचा हा सिलसिला त्याच्यासाठी नक्कीच निराशाजनक आहे. आता पुढच्या वेळी ९०चा टप्पा पार केल्यानंतर वैभव शतक पूर्ण करतो का, याकडे चाहत्यांचं लक्ष असेल.

VAIBHAV SOORYAVANSHI NERVOUS 90 RECORD

|

esakal

घरात तुटलेल्या वस्तू ठेवणं अशुभ का मानतात?

Vastu Beliefs

|

esakal

येथे क्लिक करा