वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती?

Pranali Kodre

वैभव सूर्यवंशी

१५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहेत. त्याने १५ सामन्यांत ६८० धावा केल्या आहेत.

Vaibhav Suryavanshi net worth

|

Sakal

लोकप्रियतेमध्येही पडतेय भर

वैभवच्या लोकप्रियतेमध्येही सध्या भर पडत आहे. त्याचा नेटवर्थ आता कोट्यवधींमध्ये गेला आहे.

Vaibhav Sooryavanshi

|

Sakal

घर

Housivity.com च्या रिपोर्ट्सनुसार वैभवने मुंबईत अडीच ते तीन कोटींच्या आसपास रकमेचे घर घेतले आहे. तसेच त्याचे त्याच्या मुळगावी ताजपूरमध्येही घर आहे, ज्याची किंमत साधारण ४० ते ६० लाख रुपये आहे.

Vaibhav Sooryavanshi assets

|

Sakal

आयपीएल सॅलरी

याशिवाय वैभवला राजस्थानने २०२५ आयपीएल हंगामात १.१ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. आता तो दोन वर्षे या संघाकडून खेळतोय.

Vaibhav Sooryavanshi IPL Salary

|

Sakal

मॅच फी

तसेच त्याला प्रत्येक सामन्यासाठी ७.५ लाख रुपये फी मिळते, त्याने आत्तापर्यंत २२ सामन्यात १.६५ कोटी मॅच फी म्हणून मिळवली.

Vaibhav Sooryavanshi Match Fee

|

Sakal

बक्षीसं

वैभवला आत्तापर्यंत अनेक बक्षीसंही मिळाली आहेत. त्याला आयपीएल २०२५ मध्ये सर्वोत्तम स्ट्राईकरेटसाठी जवळपास १७ लाखांची टाटा कर्व्ह ईव्ही कारही बक्षीस मिळाली होती.

Vaibhav Sooryavanshi Prizes

|

Sakal

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेता

याशिवाय वैभव १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून खेळला आहे. त्याने २०२६ मध्ये झालेला १९ वर्षाखालील वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्याला ५० लाख बक्षीस दिले होते.

Vaibhav Sooryavanshi World Cup Winner

|

Sakal

नेटवर्थ

वैभवची लोकप्रियता पाहाता त्याला आता अनेक स्पॉन्सर्सही मिळत आहेत. त्यामुळे सध्या तरी त्याची नेटवर्थ ७ कोटीच्या आसपास असली, तरी यात आता वाढ होऊ शकते.

Vaibhav Sooryavanshi Total Net Worth

|

Sakal

IPL 2027: हार्दिक पांड्याची हकालपट्टी? मुंबई इंडियन्स कोणाला रिलीज करणार?

येथे क्लिक करा