Pranali Kodre
भारताचा उदयोन्मुख खेळाडू वैभव सूर्यवंशीने त्याच्या आत्तापर्यंतच्या छोट्या कारकिर्दीतही मोठी छाप पाडली आहे.
Vaibhav Suryavanshi Rewarded
Sakal
त्याने काही दिवसांपूर्वीच १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धाही भारतीय संघासाठी जिंकली.
Vaibhav Suryavanshi Rewarded
Sakal
इतकेच नाही, तर त्याने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ८० चेंडूत १७५ धावांची मोठी खेळी केली होती. त्यामुळे त्याला अंतिम सामन्यातील सामनावीर आणि स्पर्धेचा मालिकावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
Vaibhav Suryavanshi Rewarded
Sakal
त्याने या संपूर्ण स्पर्धेत भारतासाठी ७ सामन्यांत सर्वाधिक ४३९ धावाही केल्या. यामध्ये तीन अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे.
Vaibhav Suryavanshi Rewarded
Sakal
त्याच्या या कामगिरीनंतर आता त्याचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून २२ फेब्रुवारी रोजी खास सत्कारही झाला. वैभव बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.
Vaibhav Suryavanshi Rewarded
Sakal
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या संकल्प सभागार येथे वैभवचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी त्याला तब्बल ५० लाखांचा चेक बक्षीस म्हणून देण्यात आला.
Vaibhav Suryavanshi Rewarded
Sakal
इतकेच नाही, तर आयपीएल २०२५ मध्ये वैभवला 'सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन' पुरस्कार मिळाला होता, यासाठी त्याला TATA Curvv कार मिळणार होती.
Vaibhav Suryavanshi Rewarded
Sakal
आता ही कारही त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात नुकतीच देण्यात आली आहे. दरम्यान, त्याला TATA Curvv कारचे कोणते मॉडेल मिळाले आहे, हे अद्याप समजलेलं नाही.
Vaibhav Suryavanshi Rewarded
Sakal
India vs South Africa | T20 World Cup 2026
Sakal