Pranali Kodre
एमएस धोनी भारताचा दिग्गज कर्णधार आणि यशस्वी खेळाडू राहिला आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने अनेक अविस्मरणीय विजय मिळवलेत.
Inspirational Lessons from MS Dhoni
Sakal
कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीकडून वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
Inspirational Lessons from MS Dhoni
Sakal
धोनीला 'कॅप्टन कूल' उगाच म्हटलं जात नाही. कितीही दबावाची स्थिती असली तरी त्याचा संयम ढळत नाही. त्यामुळे त्याच्याकडून दबावाच्या परिस्थितीत शांत राहिलं, तर चांगले निर्णय घेता येतात हे शिकण्यासारखं आहे.
Inspirational Lessons from MS Dhoni
Sakal
धोनी नेहमी म्हणतो निकालाप्रेक्षा प्रोसेसवर लक्ष द्या. भविष्याची आणि यश-अपयाशाची चिंता करण्यापेक्षा सध्या आपण काय सर्वोत्तम करू शकतो त्यावर लक्ष द्यायला हवे, हे यातून शिकायला मिळतं.
Inspirational Lessons from MS Dhoni
Sakal
धोनीच्या नेतृत्वातून हे देखील शिकायला मिळते की निर्णय घेताना भावनांपेक्षा व्यावहारिक परिस्थितीला आणि गरज ओळखून निर्णय घेता आले पाहिजेत.
Inspirational Lessons from MS Dhoni
Sakal
धोनीने जसं कारकिर्दीत यश पाहिलं, तसं अपयशही पाहिलं, पण त्याने क्वचितच त्याच्यावरील ताबा गमावला. त्यामुळे स्वतःच्या वागण्याचा ताबा नेहमी आपल्या हातात ठेवा आणि यश-अपयश तात्पुरते असते, त्यामुळे अशावेळी तोल ढळू न देणं महत्त्वाचे असते.
Inspirational Lessons from MS Dhoni
Sakal
योग्य वाटणारा निर्णय आत्मविश्वासाने घ्या आणि त्याची जबाबदारी स्वीकारा, हे देखील धोनीकडून शिकायला मिळते.
Inspirational Lessons from MS Dhoni
Sakal
दीर्घकाळ यशस्वी राहण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्न करा, हे देखील धोनीच्या करियरमधून शिकता येते.
Inspirational Lessons from MS Dhoni
Sakal
धोनीकडून सर्वात मोठी शिकवण काय असेल तर ती म्हणजे खरा नेता तोच जो स्वतःबरोबर इतरांनाही घडवतो आणि पुढच्या पिढीसाठी प्रेरणा बनतो.
Inspirational Lessons from MS Dhoni
Sakal
Lionel Messi
Sakal