सकाळ डिजिटल टीम
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन त्याच्या आगामी बेबी जॉन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
या चित्रपटात सलमान खानच्या चाहत्यांसाठीही एक आनंदाची बातमी आहे.
या चित्रपटात सलमान कॉमिक रोलमध्ये दिसणार आहे.
पिंकविलाच्या मुलाखतीदरम्यान, वरुणने त्याचा आणि सलमान खानचा किस्सा सांगितला.
'माझे आणि सलमानचे नाते अत्यंत खास आहे. त्याच्यासोबत असताना मी स्वताला लहान मूल समजतो,' असे वरुण म्हणाला.
'सलमान घरी आला की, माझ्या आईच्या हातचे पनीर खायचा व माझी रोटी चोरायचा.' वरूणने बालपणीची आठवण सांगितली.
वरुण धवन व सलमान खान यांना सोबत बघणे ही चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे.
बॉलिवुड अभिनेता वरुण धवन 'बेबी जॉन' साठी अत्यंत उत्सुक असलेला दिसत आहे.
बेबी जॉन चित्रपट २५ डिसेंबर रोजी रिलिज होणार आहे.