विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा; सोन्याचं बाशिंग, लगीन देवाचं लागलं

सूरज यादव

विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा

पंढरपूरमध्ये वसंत पंचमीला श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते.

Viththal Rukmini vivah sohla | Esakal

वसंत पंचमी

माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी. वसंत ऋतूची चाहूल गालते म्हणून माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते.

Viththal Rukmini vivah sohla | Esakal

10 ते १२ वाजेपर्यंत विवाह सोहळा

परंपरेनुसार वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी १२ या वेळेत विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा झाला.

Viththal Rukmini vivah sohla | Esakal

स्वयंवराची कथा

वसंत पंचमीच्या आधी दोन-तीन दिवस मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी स्वयंवराची कथा सांगितली जाते. त्यानंतर वसंत पंचमीला शाही विवाह सोहळा होतो.

Viththal Rukmini vivah sohla | Esakal

मंदिराला फुलांची सजावट

विठ्ठल-रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यानिमित्त मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली होती. चार टन फुले आणि १ टन उसाचा वापर केला होता.

Viththal Rukmini vivah sohla | Esakal

बंगळुरूहून खास पोशाख

विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी बंगळुरूहून पोशाख आला. परंपरेनुसार हा सोहळा मंदिरात पार पडला.

Viththal Rukmini vivah sohla | Esakal

सोन्याच्या मुकुटाऐवजी पांढरे पागोटे

वसंत पंचमीला पहाटे काकडा आरतीला विठ्ठलाला सोन्याच्या मुकूटाऐवजी पांढरे पागोटे घातले जाते.

Viththal Rukmini vivah sohla | Esakal

गुलाल उधळला

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर गुलाल उधळला जातो. पांढरा पोशाख आणि त्यावर गुलाल उधळण्याची परंपरा आहे.

Viththal Rukmini vivah sohla | Esakal

रंग पंचमीपर्यंत पांढरा पोशाख

वसंत पंचमी पासून रंग पंचमीपर्यंत विठ्ठलाला पांढरा पोशाख घातला जातो. तसंच पूजेवेळी गुलाल टाकला जातो.

Viththal Rukmini vivah sohla | Esakal

Vasant Panchami : तब्बल ३० वर्षांनी राजयोग, या राशींना शुभ संकेत

इथं क्लिक करा