शिवरायांचा एक गुप्त किल्ला, जो औरंगजेबाला कधीच सापडला नाही

Shubham Banubakode

सह्याद्रीतील अजिंक्य गड

सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला उर्फ व्याघ्रगड हा सह्याद्रीच्या घनदाट जंगलात लपलेला, अत्यंत दुर्गम आणि अजिंक्य किल्ला आहे. शिवकाळात हा किल्ला शत्रूंना सहज गवसणारा नव्हता.

Vasota Fort

|

Esakal

औरंगजेबालाही नाही सापडला

औरंगजेबाने अनेक किल्ल्यांवर हल्ले केले; मात्र वासोट्यापर्यंत तो कधीच पोहोचू शकला नाही. इतका हा किल्ला दुर्गम आणि सुरक्षित होता.

Vasota Fort

|

Esakal

शिवाजी महाराजांनी नाव

छत्रपती शिवाजी महाराजांनी वासोटा जिंकल्यानंतर त्याला ‘व्याघ्रगड’ असे नाव दिले. वाघांचे वसतिस्थान आणि घनदाट जंगल यामुळे हे नाव अत्यंत संयुक्तिक ठरते.

Vasota Fort

|

Esakal

स्वराज्यद्रोह्यांसाठी तुरुंग

शिवकाळात वासोट्याचा वापर स्वराज्यद्रोह्यांना कैदेत ठेवण्यासाठी केला जात असे. इंग्रज अधिकारीसुद्धा येथे कैदेत ठेवण्यात आले होते.

Vasota Fort

|

Esakal

इंग्रज अधिकाऱ्यांनाही डांबले

पन्हाळा वेढ्यावेळी इंग्रजांनी सिद्दी जोहरला मदत केल्याने शिवाजी महाराजांनी इंग्रज अधिकाऱ्यांना अटक करून वासोट्याच्या तुरुंगात ठेवले होते.

Vasota Fort

|

Esakal

राजाराम महाराजांचा गुप्त मार्ग

छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून जिंजीकडे जाताना प्रतापगड–वासोटा मार्गे गेले होते. हा किल्ला गुप्त हालचालींसाठी महत्त्वाचा ठरला.

Vasota Fort

|

Esakal

जैवविविधतेचा खजिना

वासोटा हा ‘वनदुर्ग’ म्हणून ओळखला जातो. आजही येथे वाघ, बिबट्या, विविध पक्षी आणि दुर्मिळ वनस्पती आढळतात.

Vasota Fort

|

Esakal

शौर्य आणि निसर्गाचा संगम

वासोटा किल्ला म्हणजे शिवरायांच्या शौर्याची साक्ष, इतिहासाचा जिवंत वारसा आणि निसर्गसौंदर्याचा अद्भुत अनुभव आहे.

Vasota Fort

|

Esakal

महाराष्ट्रातील रहस्यमयी गाव! पाच दिवस गावाबाहेर राहतात गावकरी, कारण काय?

Maharashtra mysterious village

|

Esakal

हेही वाचा -