बाळकृष्ण मधाळे
वास्तूशास्त्रात जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम सांगितलेले आहेत. अगदी छोट्या सवयींपासून मोठ्या निर्णयांपर्यंत.. या तत्त्वांचे योग्य पालन केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
Vastu Bath Remedies
esakal
जर वास्तूचे नियम पाळले नाहीत, तर कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. यशाच्या उंबरठ्यावर असलेली कामे अर्धवट राहू शकतात आणि आयुष्यात अडचणींची मालिका सुरू होऊ शकते.
Vastu Bath Remedies
esakal
काही सोपे उपाय तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. अंघोळीच्या पाण्यात काही विशिष्ट घटक मिसळल्यास प्रगतीस चालना मिळते, असे मानले जाते.
Vastu Bath Remedies
esakal
अंघोळीच्या पाण्यात मीठ मिसळल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. घरात आणि मनात सकारात्मकतेचा प्रभाव वाढतो.
Vastu Bath Remedies
esakal
तमालपत्र वापरल्यास व्यवसायात वाढ होण्यास मदत होते, असे मानले जाते. तसेच आर्थिक अडचणी कमी होण्यासही हा उपाय उपयोगी ठरू शकतो.
Vastu Bath Remedies
esakal
लवंग मिसळून अंघोळ केल्यास अडकलेली कामे पुन्हा मार्गी लागतात, अशी श्रद्धा आहे. नशिबातील अडथळे दूर होण्यास मदत होते.
Vastu Bath Remedies
esakal
गुलाबाच्या पाकळ्या पवित्र मानल्या जातात. त्या अंघोळीच्या पाण्यात घातल्यास मानसिक शांती मिळते आणि जीवनात सकारात्मकता वाढते.
Vastu Bath Remedies
esakal
हे उपाय करताना मनात सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नकारात्मक भावना असल्यास या उपायांचा अपेक्षित परिणाम दिसून येणार नाही.
टीप : हा लेख श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे.
Vastu Bath Remedies
esakal
Amazing Date Seeds Benefits
esakal