वास्तुशास्त्रानुसार घरात बांबू प्लांट ठेवण्याचे फायदे कोणते?

Pranali Kodre

Lucky Bamboo Plant

वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार घरामध्ये किंवा ऑफिस डेस्कवर लकी बांबूचे रोप (Lucky Bamboo Plant) ठेवणे शुभ मानले जाते.

Vastu benefits of lucky bamboo plant

|

Sakal

सुख, समृद्धी

वास्तुशास्त्रानुसार लकी बांबुचे झाड नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता आणण्यास मदत करते. तसेच आर्थिक अडचणी दूर होतात.

Vastu benefits of lucky bamboo plant

|

Sakal

सकारात्मक ऊर्जा

लकी बांबूचे झाड नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते असंही म्हटलं जातं.

Vastu benefits of lucky bamboo plant

|

Sakal

नात्यांमध्ये गोडवा

याशिवाय लकी बांबूच्या झाडामुळे मानसिक ताणतणाव कमी होतो आणि नात्यांमध्ये गोडवा टिकून राहतो.

Vastu benefits of lucky bamboo plant

|

Sakal

हवा शुद्ध ठेवण्यास मदत

लकी बांबू हे इनडोअर प्लांट असल्याने हवेतील विषारी घटक कमी करून हवा शुद्ध ठेवण्यासही मदत करते.

Vastu benefits of lucky bamboo plant

|

Sakal

योग्य दिशा

लकी बांबूचे रोप कौटुंबिक आरोग्य आणि सुख-शांतीसाठी पूर्व दिशेला, तर आर्थिक लाभासाठी अग्नेय दिशेला आणि करिअर आणि नोकरी-व्यवसायातील यशासाठी उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.

Vastu benefits of lucky bamboo plant

|

Sakal

लाल रिबन

लकी बांबूच्या देठांना लाल धाग्याने किंवा रिबनने बांधणे शुभ मानले जाते. तसेच चार काड्यांचे बांबूचे झाड ठेवणे मात्र अशुभ मानले जाते.

Vastu benefits of lucky bamboo plant

|

Sakal

कसं वाढवावे?

लकी बांबूचे रोप पाणी किंवा मातीमध्येही वाढते. पाण्यात ठेवल्यास ७-१० दिवसांनी पाणी बदलावे. तसेच सुकलेली पानं काढून टाकावीत.

Vastu benefits of lucky bamboo plant

|

Sakal

थेट सूर्यप्रकाश टाळा

लकी बांबूच्या रोपाला थेट सूर्यप्रकार चालत नाही, त्यामुळे उन्हात न ठेवता नैसर्गिक प्रकाश येणाऱ्या ठिकाणी ठेवावे.

Vastu benefits of lucky bamboo plant

|

Sakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Vastu benefits of lucky bamboo plant

|

Sakal

एकदा लावा, दर पावसाळ्यात फुलांनी बहरणारी रेन लिली

Rain Lily Plant

|

Sakal

येथे क्लिक करा