बाळकृष्ण मधाळे
घर बांधणे किंवा जमीन खरेदी करणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो.
Should You Buy Land Based on Vastu Results?
esakal
जमीन घेतल्यानंतर ती आपल्यासाठी लाभदायक ठरेल, घरात सुख-समृद्धी येईल, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र कोणती जमीन आपल्या दृष्टीने शुभ आहे, हे कसे ओळखायचे? अशा वेळी वास्तुशास्त्र मार्गदर्शन करते.
Should You Buy Land Based on Vastu Results?
esakal
वास्तुशास्त्रानुसार, एक सोपी चाचणी करून आपण जमीन आपल्या दृष्टीने अनुकूल आहे की नाही, हे तपासू शकतो. ही चाचणी अगदी साधी आहे.
Should You Buy Land Based on Vastu Results?
esakal
या प्रयोगासाठी संबंधित जमिनीत कोपरापासून करंगळीपर्यंतच्या मोजमापाइतकी लांबी, रुंदी आणि खोली असलेला एक खड्डा खणावा. खड्डा खणल्यानंतर बाहेर काढलेली सर्व माती पुन्हा त्याच खड्ड्यात भरावी.
Should You Buy Land Based on Vastu Results?
esakal
वास्तुनुसार, जर खड्डा पूर्ण भरल्यानंतर थोडी माती उरली, तर ती जमीन शुभ मानली जाते. अशा जमिनीमुळे घरात आनंद, प्रगती आणि समृद्धी येते, असे मानले जाते.
Should You Buy Land Based on Vastu Results?
esakal
मात्र खड्डा भरल्यानंतर माती कमी पडली, तर ते अशुभ लक्षण समजले जाते. वास्तुशास्त्रानुसार, अशा जमिनीमुळे आर्थिक अडचणी किंवा नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी जमीन खरेदी करण्यापूर्वी विचार करणे योग्य ठरते.
Should You Buy Land Based on Vastu Results?
esakal
तसेच, जर माती अगदी न उरता किंवा फारशी कमी-जास्त न होता खड्डा भरला गेला, तर त्या जमिनीमुळे साधारण स्वरूपाचे लाभ मिळू शकतात.
Should You Buy Land Based on Vastu Results?
esakal
या सोप्या वास्तु चाचणीच्या मदतीने, जमीन खरेदी करण्यापूर्वी ती आपल्या दृष्टीने कितपत शुभ आहे, याचा अंदाज घेता येतो.
Should You Buy Land Based on Vastu Results?
esakal
Why Do Transgender Women Marry Iravan for One Night?
esakal