घरात सुख-शांती हवी आहे? मग देव्हाऱ्यात 'या' वस्तू ठेवू नका!

Aarti Badade

वास्तुशास्त्र आणि देव्हारा

वास्तुशास्त्रानुसार देव्हाऱ्याची रचना योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण काही विशिष्ट वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आणि सुख-शांती नष्ट होते.

Sakal

नातेवाईकांचे फोटो

देव्हाऱ्यात नातेवाईकांचे किंवा साधू-संतांचे फोटो ठेवू नयेत; असे फोटो ठेवल्याने घरात नकारात्मकता वाढू शकते.

Sakal

कडक देवतांच्या मूर्ती

देव्हाऱ्यात काली माता, राहु-केतू आणि शनिदेव यांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत, कारण या देवता कडक मानल्या जातात.

Sakal

शांत देवतांची स्थापना

देव्हाऱ्यात नेहमी शांत आणि सौम्य देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवावी, ज्यामुळे घरात सकारात्मक आणि शांत वातावरण निर्माण होते.

Sakal

नाचणाऱ्या गणेशाची मूर्ती

देव्हाऱ्यात नाचणाऱ्या गणेशाची मूर्ती ठेवू नये; त्याऐवजी गणेशाची बसलेली किंवा आशीर्वाद देणारी मूर्ती ठेवावी, ज्यामुळे घरात सुख वाढते.

Sakal

लक्ष्मीची उभी मूर्ती

माता लक्ष्मीची मूर्ती धन आणि समृद्धी आणते, पण देव्हाऱ्यात तिची उभी मूर्ती न ठेवता, बसलेली मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते.

Sakal

भगवान विष्णूची मूर्ती

घरातील मंदिरात माता लक्ष्मीच्या मूर्तीसोबत भगवान विष्णूची मूर्ती अवश्य ठेवावी, ज्यामुळे घरात धन आणि समृद्धी टिकून राहते.

Sakal

बुध-शुक्रची साथ! त्रासाचा काळ संपला; या 5 राशींचे आता नशीब पालटणार!

Sakal

येथे क्लिक करा