सकाळ वृत्तसेवा
वास्तुशास्त्रानुसार चुकीचे फोटो घरात अशांतता आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात.
चला जाणून घेऊया असे कोणते फोटो आहेत, जे घरात टाळावेच!
घरात सिंह, वाघ, साप यांसारख्या हिंसक प्राण्यांचे चित्र लावू नये. अशा प्रतिमा घरात भीती निर्माण करतात.
वास्तुशास्त्र सांगतं की बुडणारे जहाज किंवा होड्या यांचे चित्र घरात लावल्यास नकारात्मकता वाढते. हे अपयशाचे प्रतीक मानले जाते.
महाभारताच्या युद्धाचे फोटो किंवा चित्र घरात लावल्यास कलह, भांडणं आणि अशांती पसरते.
घरात शांती हवी असेल तर हे चित्र लावणे टाळा.
समाधी किंवा स्मशानभूमीचे चित्र असल्यामुळे घरात दुःख आणि नकारात्मक ऊर्जा तयार होते.
रडणारी मुले, उदास किंवा दु:खी चेहरे असलेले फोटो मन:स्थितीवर परिणाम करतात.
हे फोटो पाहून घरातील ऊर्जा कमी होते.
साप, ओसाड जागा यांची चित्रे अडथळे आणि त्रास वाढवू शकतात. घरात प्रगती हवी असेल तर अशी चित्रं टाळा.
फॅमिली फोटोसाठी लाल रंगाच्या फ्रेम वापरणं वास्तुशास्त्रानुसार टाळावं. हा रंग अशांततेचं प्रतीक मानला जातो आणि नकारात्मकता वाढवतो.
घरात निसर्ग दृश्य, फुलं, सूर्य, पाणी, आनंदी फोटो लावावेत