Pranali Kodre
विदर्भ संघाने रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. हे विदर्भाचे तिसरे रणजी विजेतेपद आहे.
विदर्भाचा केरळविरुद्ध नागपूरला झालेला अंतिम सामना अनिर्णित राहिला, पण पहिल्या डावातील ३७ धावांच्या आघाडीमुळे विदर्भाला विजेते घोषित करण्यात आले.
या विजेतेपदानंतर विदर्भ क्रिकेट असोसिएशनने खेळाडूंसाठी ३ कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली आहे.
याशिवाय मुख्य प्रशिक्षक उस्मान घाणी यांना १५ लाख रुपये, तर सहाय्यक प्रशिक्षक अतुल रानडे यांना ५ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.
याशिवाय फिजिओ डॉ. नितीन खुराना, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच युवराज सिंग दासोंधी आणि व्हिडिओ ऍनालिस्ट अमित मानिकराव यांनाही प्रत्येकी ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
संघाचे मॅनेजर जितेंद्र दर्भा, साईड आर्म स्पेशालिस्ट यश थोरात आणि मसाजर राजसिंग चंडेल यांना प्रत्येकी २ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
याशिवाय विदर्भाचा दिग्गज खेळाडू अक्षय वखारे याचाही सन्मान सामन्यानंतर करण्यात आला. वाखेरेने क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतली आहे.