Anushka Tapshalkar
शरीरासाठी प्रोटीन हे अत्यावश्यक पोषक घटक आहे. स्नायू वाढवण्यासाठी आणि शरीराला बळकट बनवण्यासाठी प्रोटीन खूपच महत्त्वाचे आहे. तुम्हाला असे वाटत असेल की फक्त मांसाहारी पदार्थांमध्येच प्रोटीन मुबलक प्रमाणात असते, परंतु अनेक शाकाहारी पदार्थांमध्ये मांसाहारी पदार्थांपेक्षा जास्त प्रोटीन असते.
Protein
sakal
सोयाबीन हा शाकाहारी प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे. १०० ग्रॅम टोफूमध्ये १२–२० ग्रॅम प्रोटीन असते. सोया दूध देखील प्रोटीनने समृद्ध आहे आणि शरीराला आवश्यक अमीनो ऍसिड्स पुरवते.
Soyabean
सुमारे २०० ग्रॅम डाळींमध्ये १८–२० ग्रॅम प्रोटीन असते. डाळींमध्ये फायबर, फोलेट, लोह आणि मॅंगनीजही मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे शरीर मजबूत राहते आणि गंभीर आजार टाळण्यास मदत होते.
Lentils
sakal
सुमारे १७० ग्रॅम शिजवलेल्या शेंगांमध्ये १५ ग्रॅम प्रोटीन असते. या ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात, तसेच वजन नियंत्रित राहते.
Beans
sakal
४० ग्रॅम ओट्समध्ये ५ ग्रॅम प्रोटीन आणि ४ ग्रॅम फायबर असतात. नियमित सेवन केल्यास शरीराला प्रोटीन आणि फायबर दोन्ही मिळतात.
Daliya| Oatmeal
sakal
क्विनोआ हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. यात इतर पोषक घटकही असतात आणि हे पूर्णपणे शाकाहारी आहारात समाविष्ट केले जाऊ शकते.
sakal
१०० ग्रॅम चिया बियामध्ये १७ ग्रॅम प्रोटीन असते. दररोज एक चमचा चिया बिया घेतल्यास प्रोटीनची कमतरता कधीच जाणवत नाही.
Chia Seeds
sakal
हिरवे मटार, गहू आणि बाजरीचा ब्रेड, वाइल्ड राइस, अक्रोड, फळे आणि भाज्यांमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असते. यामुळे फायबर मिळते आणि पचनशक्ती सुधारते.
Other Vegetarian Protein Sources
sakal
India's Largest Coffee Producing State : Karnataka
Sakal