Aarti Badade
उजव्या कुशीवर झोपले की चक्कर येते? अचानक वळले की चक्कर? हे व्हर्टिगोचे लक्षण असू शकते.
व्हर्टिगो आला की गोळी घ्यावी लागते, असा समज चुकीचा आहे. औषधाशिवायही तो नियंत्रित करता येतो.
विशिष्ट व्यायाम आणि हालचालींच्या साहाय्याने चक्कर कमी करता येते. औषधांची गरजही पडत नाही.
मेंदू, कान आणि डोळ्यांमधील समतोल यंत्रणेतील गडबडीमुळे चक्कर येते, त्यालाच व्हर्टिगो म्हणतात.
डोळे वर–खाली, डावीकडे–उजवीकडे हलवण्याचे व्यायाम नियमित करा. त्यामुळे मेंदूचा समतोल राखण्यास मदत होते.
मानेला हळूहळू डावीकडे व उजवीकडे वळवा. मानेची लवचिकता टिकवली तर चक्कर येण्याची शक्यता कमी होते.
सरळ रेषेत चालणं, एका पायावर उभं राहणं यासारख्या व्यायामांनी समतोल सुधारतो.
या व्यायामांना फार वेळ द्यायची गरज नाही. नियमितता ठेवा, फरक नक्की जाणवेल.
व्यायाम करताना कोणतीही असहजता वाटल्यास लगेच थांबा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या.