सकाळ डिजिटल टीम
बऱ्याचदा आपल्या स्टायलिश लाइफस्टाइल आणि पत्नी अंकिता लोखंडेसोबतच्या नात्यामुळे विकी जैन चर्चेत असतो.
एक टीव्ही शो 'लाफ्टर शेफ्स'च्या व्हॅलेंटाईन स्पेशल प्रोमोमध्ये विकी जैनच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.
अंकिता लोखंडेने प्रेमाबद्दल बोलताना म्हटले, ‘‘प्रेम ही एक सुंदर गोष्ट आहे, ज्यामध्ये भांडणेही होतात.’’
कृष्णा अभिषेकने मिश्कीलपणे टिप्पणी केली, ‘‘प्रेमात भांडणे होतात नव्हे फक्त भांडणेच होतात!’’
विकी जैनने अंकिताकडे पाहून म्हटले, ‘‘मला वाटतं हे प्रेम घडलंच नाही, कदाचित ते लादलं गेलं असेल!’’ आणि मोठ्याने हसू लागला.
विकी जैनच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप व्यक्त झाला. अनेकांनी त्याला ट्रोल केले.
एक चाहत्याने लिहिले, ‘‘जर प्रेम लादले गेले असेल, तर तो इतक्या वर्षांपासून या नात्यात आहेच कशाला?’’ दुसऱ्याने म्हटले, ‘‘अशा गोष्टी पब्लिक प्लॅटफॉर्मवर बोलणे टाळायला हवे!’’ काहींनी विकीची बाजू सावरली.