Payal Naik
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित 'छावा' चित्रपट आज १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालाय.
या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्यात असं म्हटलं जातंय. अनेकांना हा चित्रपट आवडला आहे.
या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने त्याच्या आयुष्यातील सगळ्यात उत्कृष्ट अभिनय केल्याचं बोललं जातंय. मात्र या चित्रपटासाठी कुणी किती मानधन घेतलंय हे तुम्हाला ठाऊक आहे का?
हा चित्रपट १३० कोटींच्या बजेटमध्ये बनलाय.
या चित्रपटात रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. तिने या चित्रपटासाठी २ कोटींचं मानधन घेतलंय.
औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नानं दोन कोटींचं मानधन घेतलंय.
अभिनेते आशुतोष राणा यांनी सिनेमात सरसेनापती हंबीराव मोहितेंची भूमिका साकारली आहे. या सिनेमासाठी त्यांनी ८० लाखांचं मानधन घेतलं आहे.
अभिनेत्री दिव्या दत्ता देखील सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तिनं सिनेमासाठी ४५ लाखांचं मानधन घेतलं आहे.
विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी १० कोटींचं मानधन घेतलं आहे.
'छावा' मध्ये कुणी केलीये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका? समोर आली मोठी अपडेट