kimaya narayan
सध्या सगळीकडे चर्चा आहे ती छावा या सिनेमाची. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा सिनेमा खूप गाजतोय.
अभिनेता विकी कौशलने या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय.
ही भूमिका साकारण्यासाठी विकीने लाठीकाठी, तलवारबाजी, घोडेस्वारी अशा अनेक गोष्टींचं त्याने प्रशिक्षण घेतलं आहे.
या भूमिकेसाठी विकीने 25 किलो वजन वाढवलं. विकीचं मूळ वजन 80 किलो होतं ते वाढवून त्याने 102 किलो केलं.
यासाठी विकीने जवळपास दररोज तीन तास वर्कआउट केला. यात स्ट्रेंथ ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग, स्टॅबिलिटी व मोबिलिटी आणि कार्डिओ या प्रकारांचा समावेश होता.
विकीला दिवसभरातून सात वेळा जेवावं लागायचं. यासाठी तो सकाळी 4 वाजता उठायचा. तसंच त्याच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन, मिनरल्स आणि भाज्यांचा समावेश असायचा. सोयाबीन, बीटाची टिक्की यांसारखे पदार्थ त्याच्या डाएटमध्ये होते.
विकीचा मेटॅबॉलिझम जास्त असल्यामुळे त्याला वजन वाढवण्यासाठी वर्कआउट करावं लागतं. म्हणून त्याने या काळात एकदाही चिट केलं नाही. इतकंच नाही तर कोणतंही जेवण टाळणं हे सुद्धा त्याच्या दृष्टीने चिट होतं.