सकाळ डिजिटल टीम
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट 'छावा' प्रेक्षकांसाठी लवकरच प्रदर्शित होणार आहे.
विकी कौशल 'छावा' मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची धाडसी आणि तेजस्वी भूमिका साकारणार आहे.
'छावा' चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
आतापर्यंतच्या पोस्टर्सने प्रेक्षकांच्या उत्सुकतेला उचलले होते. परंतु आज ट्रेलरने लक्ष वेधले आहे.
विकी कौशलचा देखणा आणि प्रभावी लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या १६ जानेवारी १६८१ रोजी झालेल्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक घटनेची कथा उलगडणार आहे.
हा ऐतिहासिक चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे, जो पूर्वी ६ डिसेंबर २०२४ रोजी असावा अशी योजना होती, पण काही कारणांमुळे तारीख पुढे ढकलली गेली आहे.