Shubham Banubakode
विदर्भाची जमीन आणि इथली घनदाट जंगलं निसर्गाच्या अनेक अनमोल देणग्यांनी समृद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे रानभाज्या.
wild vegetables of Vidarbha
Esakal
या भाज्या पेराव्या लागत नाहीत की त्यांच्यासाठी वेगळं खत-पाणी द्यावं लागतं. तरीही त्या अनेक पोषक घटक असतात.
wild vegetables of Vidarbha
Esakal
आंबट चवीची अंबाडीची भाजी विदर्भात आवडीने खाल्ली जाते. यात लोह आणि व्हिटॅमिन सीसारखे पोषक घटक असतात.
wild vegetables of Vidarbha
Esakal
टाकळ्याची भाजी पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उगवते. पारंपरिक आहारात आणि लोकऔषधांमध्ये या वनस्पतीला विशेष महत्त्व दिले जाते.
wild vegetables of Vidarbha
Esakal
काटेरी दिसणारी कर्टुले चवीला खमंग असतात. विदर्भात या रानभाजीला विशेष मागणी असते आणि अनेक घरांमध्ये आवडीने खाल्ली जाते.
wild vegetables of Vidarbha
Esakal
बांबूचे कोवळे कोंब म्हणजेच वास्ता. आदिवासी भागात ही भाजी लोकप्रिय असून यात फायबरचे प्रमाण चांगले असते.
wild vegetables of Vidarbha
Esakal
पांढऱ्या फुलांची कुरडू ही रानभाजी दिसायला नाजूक असते. ग्रामीण भागात तिचा पारंपरिक आहारात वापर केला जातो.
wild vegetables of Vidarbha
Esakal
जमिनीवर पसरणारी घोळची भाजी चवीला छान लागते. यात ओमेगा-३ फॅटी अॅसिडसह विविध पोषक घटक आढळतात.
wild vegetables of Vidarbha
Esakal
विदर्भातील रानभाज्या म्हणजे निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. या भाज्यांची ओळख आणि त्यांचा वापर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.
wild vegetables of Vidarbha
Esakal
Vidarbha Fossil Wood
Esakal