Shubham Banubakode
चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या जमिनीत कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या जंगलांचे अवशेष दडले आहेत. या अवशेषांना अश्मीभूत लाकूड म्हणतात.
Vidarbha Fossil Wood
Esakal
प्राचीन काळात भूगर्भातील हालचाली आणि ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे मोठमोठी जंगलं माती आणि लाव्हाखाली गाडली गेली.
Vidarbha Fossil Wood
Esakal
जमिनीखाली हवा न मिळाल्याने लाकडातील सेंद्रिय घटक हळूहळू नष्ट झाले. त्यांच्या जागी खनिजं साचत गेली आणि लाकूड दगड बनलं.
Vidarbha Fossil Wood
Esakal
या दगडी लाकडांवर झाडांची साल, मुळांचे तंतू आणि लाकडाची रचना स्पष्ट दिसते. त्यामुळे त्यांचं वेगळेपण लक्षात येतं.
Vidarbha Fossil Wood
Esakal
वैज्ञानिकांच्या मते, या भागातील अश्मीभूत लाकडांचे अवशेष साधारण १५ ते २५ कोटी वर्षांपूर्वीचे असावेत.
Vidarbha Fossil Wood
Esakal
या अवशेषांमधून विदर्भात पूर्वी घनदाट जंगलं आणि पाण्याचे मोठे प्रवाह होते, याची माहिती मिळण्यास मदत होते.
Vidarbha Fossil Wood
Esakal
काळ्या-तपकिरी रंगाची ही दगडी लाकडं म्हणजे निसर्गातील मोठ्या बदलांची साक्ष आहेत. पृथ्वीचा प्राचीन इतिहास त्यातून समोर येतो.
Vidarbha Fossil Wood
Esakal
चंद्रपूर-गडचिरोलीतील हा नैसर्गिक वारसा जपणं महत्त्वाचं आहे.
Vidarbha Fossil Wood
Esakal
History of Bottled Water
Esakal