Shubham Banubakode
दसरा संपल्यानंतर आणि दिवाळीच्या आधी विदर्भात आठवीची पूजा केली जाते. हा सण निसर्ग, शेती आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीशी जोडलेला आहे.
Aathavi Puja in Vidarbha
esakal
आश्विन महिन्यात खरीप पिकं तयार होऊ लागतात. नवीन ज्वारी आणि इतर धान्य घरात येण्याच्या आनंदात देवीचं पूजन करून निसर्गाचे आभार मानले जातात.
Aathavi Puja in Vidarbha
esakal
आठवीच्या पूजेत हत्तीचं चित्र काढून त्याची पूजा केली जाते. हत्तीला गजलक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तो पाऊस आणि समृद्धीचंही प्रतीक आहे.
Aathavi Puja in Vidarbha
esakal
लोककथेनुसार, गांधारीने भव्य पूजा केली; पण कुंतीला आमंत्रण दिलं नाही. तेव्हा अर्जुनाने इंद्राचा हत्ती ऐरावत पृथ्वीवर आणण्याचं वचन दिलं.
Aathavi Puja in Vidarbha
esakal
अर्जुनाने ऐरावताला पृथ्वीवर आणल्यानंतर कुंतीने नवीन ज्वारीच्या पिठाची आंबील आणि मोसमी फळं अर्पण करून गजलक्ष्मीची पूजा केली.
Aathavi Puja in Vidarbha
esakal
विदर्भातील काही समाजांमध्ये भिंतीवर दोन हत्ती काढतात. पाच दगड पांडवांचं प्रतीक मानतात. काही ठिकाणी रात्री पूजेनंतर सकाळी सूर्यपूजा केली जाते.
Aathavi Puja in Vidarbha
esakal
या पूजेत ज्वारीच्या पिठापासून आंबील तयार केली जाते. बोरं, आवळा, चिंच यांसारखी मोसमी फळंही देवीला अर्पण केली जातात.
Aathavi Puja in Vidarbha
esakal
आठवीची पूजा म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही. शेती, अन्नधान्य, कष्टकरी माणसं आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा विदर्भाचा हा अनमोल सांस्कृतिक वारसा आहे.
Aathavi Puja in Vidarbha
esakal
Ramlila Maidan
esakal