Shubham Banubakode
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे मुन्हादेवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराजवळील एका विहिरीची कहाणी आजही अनेकांना आकर्षित करते.
Vidarbha Treasure Well
esakal
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या विहिरीत जुन्या काळातील खजिना लपवण्यात आला होता. त्यामुळे या विहिरीला खजिन्याची विहीर म्हणूनही ओळखले जाते.
Vidarbha Treasure Well
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती प्रतापराव गुजर यांनी कारंजा लुटल्यानंतर मिळवलेली संपत्ती घेऊन अचलपूरच्या दिशेने प्रवास केला होता, असं सांगितलं जातं.
Vidarbha Treasure Well
esakal
प्रवासादरम्यान प्रतापराव गुजर यांनी मुन्हादेवीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांनी आणलेल्या खजिन्यातील काही संपत्ती परिसरातील विहिरीत लपवली.
Vidarbha Treasure Well
esakal
एका आख्यायिकेनुसार, पूर्वी अंजनगाव सुर्जी परिसरात मृग नावाच्या दैत्याची दहशत होती. जगदंबेने त्याला साखळदंडाने बांधून विहिरीत कैद केले.
Vidarbha Treasure Well
esakal
स्थानिकांच्या सांगण्यानुसार, चैत्र पौर्णिमेच्या रात्री या विहिरीतून आवाज ऐकू येतो. सध्या ही विहीर बंद असून तिच्यावर महादेवाची पिंड आणि नंदी आहेत.
Vidarbha Treasure Well
esakal
मुन्हादेवीची मूर्ती सुमारे आठशे वर्षे जुनी असल्याचे पुरातत्त्व विभागाने नमूद केल्याची माहिती मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
Vidarbha Treasure Well
esakal
महात्मा गांधींच्या मंदिर प्रवेश चळवळीदरम्यान मुन्हादेवीचे मंदिर हरिजनांसाठी खुले करण्यात आले. डिसेंबर १९३३ मध्ये गांधीजींनी मंदिर संस्थानचे आभार मानणारे पत्र पाठवले होते.
Vidarbha Treasure Well
esakal
cat
esakal