विड्याच्या पानांचा मोदक कधी खाल्लाय का? जाणून घ्या रेसिपी

Varsha Balhe

बाप्पाच्या आवडीचे मोदक

गणेशोत्सव सुरू झाला की बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवायची लगबग सुरू होते. यंदा नेहमीच्या उकडीच्या किंवा तळणीच्या मोदकांपेक्षा काहीतरी वेगळं बनवायचं असेल, तर ही रेसिपी नक्की करून पाहा.

Betel Leaf Modak Recipe

|

esakal

वेगळ्या पद्धतीचा मोदक

अनेक प्रकारचे मोदक बाप्पासाठी बनवले जातात. परंतु आज आपण एका वेगळ्या पद्धतीचा मोदक पाहणार आहोत, तो म्हणजे विड्याच्या पानांचा मोदक.

Betel Leaf Modak Recipe

|

esakal

मोदकांचा बेत

बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही यंदा या पान मोदकांचा बेत करू शकता. हे मोदक चवीला स्वादिष्ट आणि सुगंधी लागतात. चला तर मग, जाणून घेऊया पान मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.

Betel Leaf Modak Recipe

|

esakal

सारण

सारणासाठी गुलकंद, काजू-बदाम, पिस्ते, बेदाणे, बडीशेप आणि खोबऱ्याचा किस घ्या. हे सर्व साहित्य एकत्र करून चांगले मिक्स करा.

Betel Leaf Modak Recipe

|

esakal

खवा आणि तूप

आता मोदकाच्या आवरणासाठी खवा आणि तूप घ्या. विड्याची पाने स्वच्छ धुऊन देठ काढा आणि थोडं दूध किंवा पाणी घालून त्याची बारीक पेस्ट तयार करा.

Betel Leaf Modak Recipe

|

esakal

तूप गरम

पॅनमध्ये तूप गरम करून त्यात खवा मंद आचेवर परता. त्यात विड्याच्या पानांची पेस्ट घालून मिश्रण एकजीव करा. गॅस बंद करून मिश्रण कोमट झाल्यावर त्यात पिठीसाखर मिसळा.

Betel Leaf Modak Recipe

|

esakal

मिश्रण

शेवटी मोदकाच्या साच्याला थोडं तूप लावून खव्याचं मिश्रण भरा. मधोमध गुलकंदाचं सारण भरून मोदक बंद करा आणि साच्यातून अलगद बाहेर काढा. तयार झाले तुमचे चविष्ट आणि सुगंधी विड्याच्या पानांचे मोदक.

Betel Leaf Modak Recipe

|

esakal

तयार आहे

साच्यातून मोदक बाहेर काढा. तुम्ही हे मोदक उकडून किंवा तळून घेऊ शकता. तयार आहेत तुमचे चविष्ट विड्याच्या पानांचे मोदक

Betel Leaf Modak Recipe

|

esakal

“हरतालिकेच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ 6 गोष्टी; व्रत करणाऱ्या महिलांनी नक्की वाचा

HARTALIKA TEEJ 2026

|

esakal

येथे क्लिक करा