विद्यानंद बापटांनी उच्चारलेल्या सुभाषिताचा नेमका अर्थ काय?

सकाळ डिजिटल टीम

डीजेविरोधातील लढ्यामुळे चर्चेत

पुण्याच्या गणेशोत्सवात डीजे अन् कर्णकर्कश आवाजावर बंदीची मागणी करणारे नागरिक विद्यानंद बापट एका मुलाखतीत उच्चारलेल्या संस्कृत श्लोकामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत.

Vidhyanand Bapat’s Fight Against Noise Pollution

|

sakal 

सवंग प्रसिद्धीवर बापटांचे भाष्य

मुलाखतीदरम्यान त्यांनी "मला कोणतीही सवंग प्रसिद्धी (चीप पब्लिसिटी) नको आहे" हे पटवून देण्यासाठी 'घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...' या प्रसिद्ध संस्कृत सुभाषिताचा वापर केला.

Vidhyanand Bapat’s Fight Against Noise Pollution

|

sakal

सुभाषिताची मूळ संकल्पना

लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा समाजात प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात, यावर भाष्य करणारे हे एक अतिशय उपरोधिक आणि उपहासात्मक (सॅटायरिकल) सुभाषित आहे.

Vidhyanand Bapat’s Fight Against Noise Pollution

|

sakal 

'घटं भिन्द्यात्'चा अर्थ

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् रासभरोहणम्।

येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्॥

श्लोकातील पहिल्या टप्प्याचा अर्थ स्वतःकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मातीचे माठ किंवा घडा फोडणे असा होतो.

Vidhyanand Bapat’s Fight Against Noise Pollution

|

sakal 

'पटं छिन्द्यात्'चा अर्थ

दुसऱ्या टप्प्यात स्वतःचे कपडे (वस्त्र) फाडून लोकांसमोर विचित्र चाळे करणे असा अर्थ अभिप्रेत आहे.

Vidhyanand Bapat’s Fight Against Noise Pollution

|

sakal 

'कुर्यात् रासभरोहणम्'चा अर्थ

तिसऱ्या टप्प्यात प्रसिद्धीसाठी अगदी गाढवावर स्वार होणे किंवा बसून फिरणे ही लाजिरवाणी गोष्ट करण्यासही मागेपुढे न पाहणे असा होतो.

Vidhyanand Bapat’s Fight Against Noise Pollution

|

sakal 

'येन केन प्रकारेण...'

कोणत्याही मार्गाने, मार्ग कितीही चुकीचा किंवा थिल्लर असो, काही लोकांना फक्त आणि फक्त प्रसिद्ध व्हायचे असते, ही मानसिकता यातून दाखवली आहे.

Vidhyanand Bapat’s Fight Against Noise Pollution

|

sakal 

सवंग लोकप्रियतेवर सडकून टीका

सन्मानाने ओळख मिळत नसेल, तर कुप्रसिद्धी किंवा विचित्र कृत्ये करून प्रसिद्धी मिळवणाऱ्यांवर आणि सवंग लोकप्रियतेवर या श्लोकातून अतिशय चपखल व्यंग्य करण्यात आले आहे.

Vidhyanand Bapat’s Fight Against Noise Pollution

|

sakal 

उद्देश

फक्त गोंधळ किंवा हंगाम उभा करणे हा आपला हेतू नसून ध्वनीप्रदूषणाची समस्या मुळापासून सुटली पाहिजे, हाच आपला मुख्य उद्देश असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.

Vidhyanand Bapat’s Fight Against Noise Pollution

|

sakal 

'मराठीतील शशी थरूर'

मुलाखतीतील बापट यांचे अस्खलित मराठी आणि संस्कृतवरील प्रभुत्व पाहून सोशल मीडिया युजर्सनी त्यांना 'मराठीतील शशी थरूर' अशी उपमा देत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.

Vidhyanand Bapat’s Fight Against Noise Pollution

|

sakal 

भारतात डीजेची एन्ट्री कशी झाली?

The Rise of DJ Culture in India

|

sakal 

आणखी वाचा