संतोष कानडे
व्हिएतनाममध्ये राहणारे ८४ वर्षांचे थाई एनगोक हे मागच्या ५३ वर्षांपासून एक सेकंदही झोपलेले नाहीत.
१९७३ मध्ये त्यांना एकदा प्रचंड मोठा ताप आला होता, तो ताप उतरल्यानंतर त्यांची झोप अचानक गायब झाली ती आजतागायत परत आलीच नाही.
वैद्यकीय शास्त्रानुसार माणूस काही दिवस न झोपल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो; मात्र ५ दशके न झोपूनही थाई एनगोक पूर्णपणे निरोगी आणि जिवंत आहेत.
अनेक आंतरराष्ट्रीय डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, परंतु त्यांना कोणताही मानसिक आजार, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर शारीरिक व्याधी आढळलेली नाही.
जेव्हा संपूर्ण गाव शांत झोपलेले असते, तेव्हा एनगोक हे रात्रीच्या अंधारात आपल्या शेतात काम करतात किंवा पिकांची राखण करतात.
झोप येण्यासाठी त्यांनी अनेक कडक औषधे आणि राइस वाइन पिऊन पाहिली, तरीही त्यांच्या डोळ्यांवर साधी डुलकीही आली नाही.
एवढ्या वर्षांची झोप नसतानाही ते दररोज ५० किलो वजनाची तांदळाची पोती कित्येक किलोमीटर सहज वाहून नेतात.
जगातील मोठे वैज्ञानिक आणि स्लीप एक्स्पर्ट्स त्यांच्या शरीराची रचना समजून घेण्यासाठी आजही संशोधन करत आहेत.
त्यांच्या पत्नी आणि मुलांच्या मते, त्यांची रात्रीची हालचाल अगदी सामान्य असते, फक्त त्यांचे डोळे कधीच बंद होत नाहीत.
निसर्गाच्या सर्व नियमांना आव्हान देणाऱ्या थाई एनगोक यांचे नाव जगातील सर्वात जास्त काळ न झोपलेला माणूस म्हणून इतिहासात नोंदवले गेले आहे.