तामिळमध्ये १५५, गणितात ९५; विजयला दहावीत किती गुण होते? मार्कलिस्ट व्हायरल

सूरज यादव

थलपती विजय

तामिळनाडुत पहिल्याच निवडणुकीत अभिनेता थलपतीच्या टीव्हीके पक्षानं घवघवीत यश मिळवलंय. मात्र हाच थलपती विजय दहावीच्या परीक्षेत काही विषयात काठावर पास होता.

Thalapathy Vijay

|

Esakal

बहुमत

बहुमताचा आकडा गाठता न आल्यानं विजयचं सत्तास्थापनेचं गणित अद्याप जुळलेलं नाही. गणिताचा आणि त्याचा शाळेपासूनच ३६चा आकडा आहे.

Thalapathy Vijay

|

Esakal

गुणपत्रक

थलपती विजयचं दहावीचं गुणपत्रक आता व्हायरल होत आहे. त्या गुणपत्रकानुसार विजयला दहावीत ११०० पैकी ७११ गुण मिळाले होते.

Thalapathy Vijay

|

Esakal

इंग्रजी

तामिळ भाषेत २०० पैकी १५५, इंग्रजीत २०० पैकी १३३ तर विज्ञानात ३०० पैकी २०६ गुण विजयने मिळवले होते.

Thalapathy Vijay

|

Esakal

गणित कच्चं

सामाजिक विज्ञान आणि गणितात त्याला कमी गुण होते. सामाजिक विज्ञानात २०० पैकी १२२ तर गणितात २०० पैकी फक्त ९५ गुण तो मिळवू शकला होता.

Thalapathy Vijay

|

Esakal

कॉलेज अर्धवट

विजयने हायस्कूलचं शिक्षण झाल्यानंतर लोयोला कॉलेजमध्ये व्हिज्युअल कम्युनिकेशनसाठी प्रवेश घेतला होता. पण चित्रपटसृष्टीत करिअरसाठी त्याने कॉलेज अर्धवट सोडलं.

Thalapathy Vijay

|

Esakal

अभिनय

तीन दशकांपेक्षा जास्त काळ चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर विजयने दोन वर्षांपूर्वी टीव्हीके पक्षाची घोषणा केली.

Thalapathy Vijay

|

Esakal

शेवटचा चित्रपट

विजयचा शेवटचा चित्रपट जन नायकन हा मानला जात आहे. तो अद्याप प्रदर्शित झालेला नाही. या चित्रपटात पूजा हेगडे, बॉबी देओल, प्रकाश राज यांसह इतर कलाकार आहेत.

Thalapathy Vijay

|

Esakal

वरच्या मजल्यावर आहे कारण सांगून सिलिंडर डिलिव्हरीला एक्स्ट्रा पैसे मागतायत? नियम काय सांगतो?

Gas Cylinder Delivery

|

Esakal

इथं क्लिक करा