Shubham Banubakode
मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुखांची गाडी मंत्रालयात येताच त्यांना एक गरीब महिला दरवाज्याजवळ उभी दिसायची. एके दिवशी त्यांची तिची विचारपूस केली.
थरथरत्या हातांनी फाइल पुढे करत त्या महिलेने आपली कहाणी सांगितली. ती एका सरकारी कर्मचाऱ्याची विधवा पत्नी होती.
पतीच्या निधनानंतर तिने वरळी सी फेसजवळच्या कर्मचारी वसाहतीत कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरू केला होता.
एकेदिवशी मनपा अधिकाऱ्याची तिला 'हप्ता' मागण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ती हप्ता देत होती, पण हळूहळू रक्कम वाढली.
वाढीव हप्ता देण्यास नकार दिल्याने अधिकाऱ्यांनी तिची टपरी उचलली. यामुळे तिच्या मुलांचे शिक्षण थांबले आणि जेवणाचीही भ्रांत झाली.
ही कहाणी ऐकून विलासरावांचे डोळे पाणावले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम सचिवांना तात्काळ बोलावले.
तसेच संध्याकाळी टपरी पुन्हा उभारण्याचे, इस्त्री परत करण्याचे आणि त्या अधिकाऱ्याला हजर करण्याचे आदेश दिले.
सचिवांनी त्वरित कारवाई करत ही टपरी उभारून दिली. संध्याकाळी विलासराव स्वतः सचिवांसह वरळी सी फेस येथील वसाहतीत गेले आणि शहनिशा केली.
महिलेनेही समाधान व्यक्त करत विलासरावांना स्टूलवर बसवून चहा दिला. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते, जे विलासरावांनी स्वतःच्या रुमालाने पुसले.