Yashwant Kshirsagar
भारतात एक असे अनोखे गाव आहे जिथे प्रत्येक पुरूषाला दोन लग्न करावी लागतात. याचे कारणही ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
राजस्थानच्या मधील रामदेयो गाव अनोख्या परंपरेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. या गावात प्रत्येक पुरूष दोन लग्नं करतो आणि ही काही नवीन गोष्ट नाही तर शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे.
गावात राहणाऱ्या पुरूषांच्या दोन्ही बायका एकाच घरात एकत्र राहतात. त्यांच्यातील परस्पर सौहार्द इतका चांगला आहे की ते एकमेकांना बहिणी मानतात.
त्या दोघी घरातील जबाबदाऱ्याही वाटून घेतात. गावातील वडीलधारी मंडळी अजूनही धार्मिक आणि कौटुंबिक दृष्टिकोनातून ही सामाजिक रचना योग्य मानतात.
लोकांचा असा विश्वास आहे की एक पत्नी ठेवल्यानेअसली तर तिला फक्त मुली होतात, तर दुसऱ्या लग्नामुळे मुलगा होण्याची शक्यता वाढते. म्हणून पुरुष दोन लग्न करतात.
पण, गावातील नवीन पिढी या परंपरेवर प्रश्न उपस्थित करू लागली आहे. तरुणांचे म्हणणे आहे की दोन लग्न करणे हे केवळ सामाजिकदृष्ट्या योग्य नाही तर कायदेशीरदृष्ट्याही चुकीचे आहे.
नवीन पिढीचे म्हणणे आहे की, मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक करणे हा चुकीचा विचार आहे आणि या आधारावर दुसरे लग्न करणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे.
अनेक तरुण आता या परंपरेचे पालन करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे या गावात ही नव्या पिढीने ही परंपरा जवळजवळ मोडीत काढली आहे.
प्रशासन देखील या परंपरेबद्दल सतर्क आहे. त्यांना या प्रथेची माहिती आहे, परंतु आतापर्यंत कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही.
प्रशासनाचे म्हणणे आहे की कोणत्याही सामाजिक प्रथेत हस्तक्षेप करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित सर्व पैलूंचा सखोल विचार करणे आवश्यक आहे.
सध्या गावातील लोकांना जागरूक करून त्यांना कायदेशीर माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.