Sandip Kapde
सह्याद्री पर्वतरांग ही निसर्गसौंदर्याने आणि जैविक संपत्तींनी परिपूर्ण अशी पृथ्वीवरील एक अनमोल देणगी आहे.
पावसाळ्यात सह्याद्रीचे दरी–कडे हिरवाईने नटून एखाद्या स्वर्गीय भूमीसारखे भासतात.
भोर तालुका देश आणि कोकणाला जोडणारा ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला या मावळ भागातील मावळ्यांनी मन, तन, धन देऊन हातभार लावला.
पुणे, सातारा आणि रायगड या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर रायरेश्वरचे विशाल पठार वसलेले आहे.
रायरेश्वरला जाताना आंबावडे गावातील श्री नागेश्वराचे दर्शन हा प्रवास अधिक पवित्र बनवतो.
संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्राच्या रक्षणासाठी संकराजी नारायण पंतसचिव यांनी अद्वितीय कार्य केले.
रायरेश्वरच्या पठारावर पोहोचण्यासाठी लोखंडी शिडी व कड्याकपाऱ्यांतून जाणारा चढाई मार्ग रोमांचक अनुभव देतो.
पठारावरून दिसणाऱ्या कृष्णा खोऱ्याचे हिरवेगार दृश्य मनाला प्रसन्न करणारे असते.
रायरेश्वरवरील गोमुखातून वाहणारे पाणी हे पठारावरील कुटुंबीयांच्या पिण्याच्या गरजा वर्षभर पूर्ण करते.
रायरेश्वरच्या शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर हेमाडपंथी शैलीतील आकर्षक दगडी बांधकामासाठी ओळखले जाते.
पावसाळ्यात रायरेश्वर पठारावर उमलणारी विविधरंगी फुले आणि फुलपाखरे पाहणाऱ्याला खऱ्या अर्थाने निसर्गाचा उत्सव अनुभवायला मिळतो.
मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ अन् शिवरायांना अनुभवलेला शंभर वर्षे अजिंक्य किल्ला
suvarndurg fort
esakal