असे एक गाव जिथे मुलीचा जन्म झाला की लावली जातात 111 झाडे!

Aarti Badade

मुलीच्या जन्माचा अनोखा उत्सव!

राजस्थानमधील पिपलांत्री गावात मुलीचा जन्म झाला की आनंदोत्सव साजरा करण्यासोबतच तिच्या नावाने १११ झाडे लावण्याची अनोखी परंपरा आहे.

111 Trees on Girl Birth, Unique Village in India

|

Sakal

कोणी सुरू केला हा उपक्रम?

गावाचे माजी सरपंच श्याम सुंदर पालीवाल यांनी आपली दिवंगत मुलगी किरण हिच्या स्मरणार्थ या पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात केली.

111 Trees on Girl Birth, Unique Village in India

|

Sakal

मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद

मुलीच्या जन्मानंतर तिच्या कुटुंबीयांसह गावकरी मिळून साधारण ३१ हजार रुपयांची रक्कम जमा करतात आणि ती मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित ठेवली जाते.

111 Trees on Girl Birth, Unique Village in India

|

Sakal

पालकांकडून घेतली जातात 'ही' वचने

मुलीचे शिक्षण पूर्ण करणे, तिचा बालविवाह न करणे आणि तिच्या जन्मानिमित्त लावलेल्या १११ झाडांची काळजी घेणे, अशी वचने पालकांकडून घेतली जातात.

111 Trees on Girl Birth, Unique Village in India

|

Sakal

गावाला मिळाली हिरवीगार ओळख

या उपक्रमामुळे गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झाले असून परिसर हिरवागार होण्यास आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळण्यास मदत झाली आहे.

111 Trees on Girl Birth, Unique Village in India

|

Sakal

मुलगी आणि निसर्ग दोघांचेही संवर्धन

पिपलांत्री गावाने मुलीच्या जन्माला झाडांच्या लागवडीशी जोडून स्त्री सन्मान, शिक्षण आणि पर्यावरण रक्षणाचा सुंदर संदेश दिला आहे.

111 Trees on Girl Birth, Unique Village in India

|

Sakal

देशासाठी प्रेरणादायी उदाहरण!

मुलीच्या जन्माचे स्वागत आणि निसर्गाचे संवर्धन एकत्र करणारे राजस्थानमधील पिपलांत्री गाव आज आपल्या अनोख्या उपक्रमामुळे देशभरात चर्चेत आहे.

111 Trees on Girl Birth, Unique Village in India

|

Sakal

महाराष्ट्रातील 'या' 5 किल्ल्यांवर पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्ती!

Chhatrapati Shivaji Maharaj fort news

|

Sakal

येथे क्लिक करा