Sandip Kapde
पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव आजही आपला ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा जपून आहे.
Where Is Dapsare Village Located in Maharashtra?
esakal
अवघ्या २० घरांची वस्ती असलेल्या या गावात माणसांची संख्या कमी असली, तरी गावाचं वैशिष्ट्य मात्र खूप मोठं आहे.
Where Is Dapsare Village Located in Maharashtra?
esakal
गावात प्रवेश करण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला एक प्राचीन पाण्याचं कुंड पाहायला मिळतं, जे बाराही महिने पाण्याने भरलेलं असल्याचं सांगितलं जातं.
Where Is Dapsare Village Located in Maharashtra?
esakal
उन्हाळ्याच्या दिवसांतही या कुंडातील पाणी आटत नसल्याचं स्थानिक सांगतात, त्यामुळे या पाण्याच्या स्रोताबद्दल विशेष कुतूहल निर्माण होतं.
Where Is Dapsare Village Located in Maharashtra?
esakal
स्थानिक आख्यायिकेनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्यासाठी याच कुंडातून पिण्याचं पाणी रायगडावर नेलं जात असे.
Where Is Dapsare Village Located in Maharashtra?
esakal
गावाच्या परिसरात हिरवीगार झाडं, डोंगररांगा आणि केळीच्या बागा पाहायला मिळतात, त्यामुळे इथलं वातावरण अतिशय प्रसन्न वाटतं.
Where Is Dapsare Village Located in Maharashtra?
esakal
गावाशेजारी असलेल्या प्राचीन देवराईमध्ये विविध प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती असून अनेक पशू-पक्ष्यांचा अधिवास आहे.
Where Is Dapsare Village Located in Maharashtra?
esakal
या देवराईमध्ये जुन्या मंदिराचे अवशेष, तीन शिवपिंडी आणि भग्न मूर्ती पाहायला मिळतात, ज्या परिसराचा प्राचीन इतिहास सांगतात.
Where Is Dapsare Village Located in Maharashtra?
esakal
गावातील अनेक घरं सध्या बंद अवस्थेत आहेत, तर काही ज्येष्ठ नागरिक आजही गावात राहून जुन्या आठवणी आणि परंपरा जपत आहेत.
Where Is Dapsare Village Located in Maharashtra?
esakal
बाराही महिने पाणी असलेलं प्राचीन कुंड, शिवकालीन इतिहास आणि निसर्गाचा अनमोल ठेवा जपणारं हे गाव म्हणजे पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील दापसरे गाव.
Where Is Dapsare Village Located in Maharashtra?
esakal
गावातील प्रसन्न वातावरण आणि बारमाही पाण्यामुळे इथले लोक शंभर वर्षे जगतात की काय, असं वाटतं; गावात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे.
Where Is Dapsare Village Located in Maharashtra?
esakal
The Last Village of Pune District
esakal