Pranali Kodre
विनोद कांबळी भारतासाठी ९० च्या दशकात क्रिकेट खेळला आहे.
विनोद कांबळीने भारतासाठी १७ कसोटी आणि १०४ वनडे सामने खेळले आहेत.
पण, तुम्हाला माहित आहे का विनोद कांबळीला एक भाऊ देखील आहे. तो अगदी विनोद कांबळीसारखाच दिसतो.
विनोद कांबळीच्या भावाचं नाव वीरू कांबळी आहे. तो विनोदचा लहान भाऊ आहे.
वीरू कांबळी गोलंदाज आहे. तसेच उजव्या हाताने गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.
काही दिवसांपूर्वीच वीरूने सोशल मीडियावर त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामुळे तो चर्चेत आला होता.
दरम्यान, विनोद कांबळीच्या भावाबाबत आत्तापर्यंत कोणताही उल्लेख केलेला नव्हता. मात्र या व्हिडिओमुळे तो चर्चेत आला.