सकाळ डिजिटल टीम
माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीने अवयव दान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्यामुळे समाजात अवयव दानाविषयी जागरूकता वाढेल.
अवयव दानासारख्या सामाजिक उपक्रमाला पाठिंबा देऊन कांबळीने समाजात सकारात्मक संदेश दिला आहे कुटुंबियांनीही त्याला संपूर्ण पाठिंबा दिला आहे.
भारतात दरवर्षी हजारो रुग्ण अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असतात. कांबळीच्या या निर्णयामुळे या समस्येकडे लोकांचे लक्ष वेधले जाईल.
विनोद कांबळी ने नर्मदा किडनी फाउंडेशनला त्याचे अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे . २०१४ मध्ये त्याने डोनर कार्डवर सही केली.
विनोद कांबळीने लोकांना त्यांचे अवयव दान करण्याचे आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये मूत्रमार्गात संसर्ग झाल्याने कांबळीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो आता पूर्णपणे बरा झाला आहे.
बीसीसीआयनेही एक व्हिडीओ पोस्ट करून अवयव दानाचे आवाहन केलं आहे. आजचा सामना त्यासाठी समर्पित असणार आहे.