Sandeep Shirguppe
कोल्हापूर शहरात असलेल्या सर्किट बेंच जवळील सिद्धार्थनगर कमानीसमोर फलक व झेंड्यावरून दोन गटांत तुफान राडा झाला.
डिजिटल फलक आणि झेंडा फाडल्याच्या अफवेने, दोन्ही गटांत दगडफेक, वाहनांची तोडफोड करून अनेक वाहने पेटवून दिली.
वीज खंडित केल्याने आणखी तणाव वाढल्याची स्थिती, पोलिसांचा धावता हस्तक्षेप; जमाव पांगवण्यासाठी मोठा प्रयत्न पाच पोलिसांसह अनेक जखमी; त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिस अधीक्षक गुप्ता व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल महिला सहभागासह जमावाकडून घोषणाबाजी, पोलिसांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वादग्रस्त फलक उतरवून, ध्वज पुन्हा लावण्यात आल्याने; जमाव शांत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रात्रभर ३०० पोलिसांचा बंदोबस्त, वाहतूक वळवण्यात आली तर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल रोखण्यासाठी सायबर पोलिसांना अलर्ट करण्यात आले आहे.
कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक घडलेला प्रकार निंदनीय असल्याचे बोलले आहे.
यावर दोन्ही समाजाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आले. घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून सीसीटीव्हीची पाहणी सुरू आहे.
दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कडक कारवाई होणार आहे. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी माहिती दिली.