Aarti Badade
ती म्हणाली "ही ३ कारणं माझ्या हृदयाला भिडली"
एका रशियन महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचं नाव केसेनिया चावरा व पती भारतीय आहे.
"माझा नवरा नेहमीच चविष्ट आणि स्वादिष्ट जेवण बनवतो" – केसेनिया चावरा भारतीय पुरुषांची स्वयंपाकातील हाताची चव खूप छान असते.
ती म्हणाली "तो आमच्या मुलांना खूप सुंदर कपडे घालतो त्यांची खूप छान काळजी घेतो, दिसण्यास देखणी असतात" भारतीय वडिलांची मुलांवरील आत्मीयता, प्रेम वेगळेच असते.
"तो नेहमीच माझी काळजी घेतो आणि माझ्यावर खूप प्रेम करतो" भारतीय नवऱ्याचं प्रेमळ आणि आपुलकीचं रूप पाहून तिने हे तिसरे कारण दिले.
या व्हिडिओला २२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
लोकांनी दिल्या हृदयस्पर्शी प्रतिक्रिया: त्यातली एक कमेंट अशी होती की "तो तिचा नवरा नाही, तो तिचं घर आहे!"
"जगातील सर्वोत्तम पती, मी तुझ्यावर खूप प्रेम करते" – केसेनिया चावरा हिने तिच्या पोस्टच्या कॅप्शन मध्ये लिहिले. प्रेम, काळजी आणि संस्कृती यांचं सुंदर उदाहरण आहे.