विरारच्या ऐतिहासिक जिवदानी मंदिराचा इतिहास माहितेय का?

Mansi Khambe

जिवदानी मंदिर

विरार शहराच्या पूर्वेला लाखो भाविकांचे श्रद्धेचे स्थान असलेले जिवदानी मंदिर वसलेले आहे. शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात भक्तांची नेहमीच मोठी गर्दी असते.

Jivdani Temple

|

ESakal

प्राचीन मंदिर

हे १५० वर्षे जुने मंदिर असून जमिनीपासून सुमारे १३७५ पायऱ्यांवर हे मंदिर वसलेले आहे. जीवनदानी मातेचं मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या अत्‍यंत प्राचीन आहे.

Jivdani Temple

|

ESakal

इतिहास

नवरात्री उत्सव निमित्त याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. यानिमित्त जीवदानी देवीचा इतिहासाबद्दल जाणून घ्या.

Jivdani Temple

|

ESakal

जिवधन किल्ला

जीवदानीच्या या डोंगरावर १७ व्या शतकाच्या सुमारास जिवधन नावाचा किल्ला होता. चिमाजीआप्पांनी हा किल्ला ३१ मार्च १७३९ रोजी जिंकून घेतला. या गडावर पांडव कालीन दगडात कोरलेल्यागुंफा ही आहेत.

Jivdani Temple

|

ESakal

पौराणिक कथा

पांडव वनप्रवासादरम्यान शूर्परका येथे येताच भगवान परशुरामांनी पवित्र केलेल्या विमलेश्वराच्या पवित्र मंदिराचे दर्शन घेतले आणि प्रभासकडे जाताना वैतरणी नदीच्या काठावर थांबले.

Jivdani Temple

|

ESakal

एकवीराची पूजा

यावेळी पांडवांनी विरार तीर्थाच्या काठावर भगवती एकवीराची पूजा केली आणि तेथील शांतता आणि उदात्त निसर्ग पाहून जवळच्या पर्वतांमध्ये गुहा खोदण्याचा निर्णय घेतला.

Jivdani Temple

|

ESakal

भगवती जीवनधानी

पांडवांनी जवळच्या टेकड्यांवर एका गुहेत एकवीर देवीचे योगलिंग स्थापित केले आणि त्याची पूजा केली. त्यांनी तिला भगवती जीवनधानी (ती देवी आहे, जी जीवनाची खरी संपत्ती आहे) म्हटले.

Jivdani Temple

|

ESakal

शक्तीपीठ

भगवान शिव त्यांच्या पत्नी सतीचे प्रेत घेऊन जात होते आणि तिच्या शरीराचे तुकडे जगभरात ५२ ठिकाणी पडले होते तेव्हापासून जीवदानीला शक्तीपीठ देखील मानले जाते

Jivdani Temple

|

ESakal

गडाचा कायापालट

आज जुन्या गडाचा कायापालट होऊन सात मजली उंच जीवदानी मंदिर उभारले गेले आहे. तर आज देवी जेथे उभी आहे त्या जागी पूर्वी लेणी होती असे म्हणतात.

Jivdani Temple

|

ESakal

१०० वर्षांपूर्वी मुंबईचे 'मुंबादेवी' मंदिर कसे दिसायचे? पाहा मन प्रसन्न करणारे फोटो

Mumba devi Temple

|

ESakal

येथे क्लिक करा