Pranali Kodre
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली कसोटीतून निवृत्त झाला आहे. विराट जून २०२५ मध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवृत्ती घेईल असं यापूर्वीपासूनच म्हटलं जात होतं. ते आता खरं ठरलं
विराट कोहलीच्या नावावर कसोटीत अनेक मोठे विक्रम आहे, जे मोडले जाणं कठीण आहे.
विराट कोहली भारताचा कसोटीतील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने ६८ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले असून सर्वाधिक ४० सामने जिंकले आहेत. त्याने १७ सामने पराभूत झाले आहेत. ११ सामने अनिर्णित राहिले आहेत.
विराट कोहलीने कसोटीत ७ द्विशतके केली आहेत. भारताकडून तो कसोटीमध्ये सर्वाधिक द्विशतके करणारा खेळाडू आहे.
विराट सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतके करणारा एकमेव खेळाडू आहे. त्याने डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविडला याबाबतीत मागे टाकले आहे, त्यांनी सलग तीन मालिकांमध्ये द्विशतके केली होती.
विराटने कसोटीत कर्णधार म्हणून २० कसोटी शतके केली आहेत. तो भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे. त्याने सुनील गावसकरांच्या ११ शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
विराटने भारतासाठी कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक ५८६४ धावा केल्या आहेत. त्याच्या मागे ३४५४ धावांसह एमएस धोनी आहे.